ganapati bappa 
जळगाव

अमळनेरमधील इतक्‍या गावात ‘एक गाव एक गणपती’

प्रा.हिरालाल पाटील

कळमसरे (ता.अमळनेर) : सर्वत्र कोरोना आजाराने भीतीचे वातावरण पसरले असल्याने सध्यस्तितित सण, उत्सव साजरे करताना मर्यादा येत आहेत. मात्र विविध उपाययोजना आणि सावधगिरी व पोलीस प्रशासनाची योग्य जबाबदारी, जनजागृतीने अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात 41 गावांमध्ये एक गाव, एक गणपती ही मोहिम राबविण्यात येत आहे.

अमळनेर पोलीस ठाणे आणि मारवड पोलीस ठाणे यात एकूण १५२ गावे येतात. त्यात अमळनेर पोलीस ठाण्याअंतर्गत ९२ गावे तर मारवड पोलीस ठाण्याअंतर्गत ६० गाव येतात. गणेश उत्सवाच्या पार्श्वभुमीवर अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल फुला यांनी तालुक्यातील सर्व गणेश मंडळाना जनजागृती करीत शासनाच्या आदेशानुसार गणेश उत्सव साजरा करण्यासाठी पंधरा दिवसाअगोदर पोलीस उपअधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन करण्यात आले होते.

या गावात आहेत एक गाव एक गणपती---
अमळनेर पोलीस ठाण्याअंतर्गत खेडी खुर्द, दापोरी खुर्द व मुंगसे, कोंढावळ, सावखेडा, रढावण, गंगापुरी, मठगव्हाण, बिलखेडा, रामेश्वर, देवळी, कन्हेरे, ढेकु सिम, खवशी, धावडे, रामेश्वर खुर्द, बिलवाड़ी खुर्द, रामेश्वर खुर्द, देवगांव देवळी, खोकरपाट, मांजर्डी, कुऱ्हेसिम, दापोरी, रणाईचे, एकरुखी, पातोंडा, टाकरखेडा, निमझरी, अंबासन, कावपिंप्री, इंदापिंप्री, धुपी, सुंदरपट्टी अशा एकूण ३१ गावांचा सहभाग आहे. यात पोलीस बंदोबस्तसाठी ५ पोलीस अधिकारी, ४५ पोलीस कर्मचारी, ३० होमगार्ड,  १ आर सी पी, १ स्ट्रकिंग फोर्स असून यात या पोलीस ठाण्याअंतर्गत ६२ सार्वजनिक गणपती मंडळानी सहभाग घेतला आहे.

उर्वरीत गावे
मारवड पोलीस ठाण्याअंतर्गत एक गाव एक गणपती असलेली गावे - यात एकूण ६० गावे मारवड पोलीस ठाण्याअंतर्गत येतात यातील दहा गावे- अंतुर्ली, शहापुर, गोवर्धन, झाडी, लोणचारम, रंजाणे, हिंगोणे खुर्द, कलाली, मालपुर, हिंगोणे बु. यांनी एक गाव एक गणपती स्थापना करण्यात आली आहे. तर एकूण ३७ सार्वजनिक मंडळानी सहभाग घेतला आहे. या पोलीस ठाण्याअंर्तगत १ पोलीस अधिकारी, २० पोलीस कर्मचारी, २१ होमगार्ड यांचा बंदोबस्त सुरु आहे.

मूर्ती संकलन करुन करणार सामायिक विसर्जन
मारवड पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावांमधील सर्व गणपती मुर्तींचे एकत्रित संकलन करण्यात येणार आहे. यानंतर सामायिक पद्धतीने बाप्पाचे विसर्जन केले जाणार आहे. येथील सहायक पोलीस निरीक्षक राहुल फुला पोलीस ठाण्याअंतर्गत गावातील गणेश विसर्जनासाठी गावातील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ गणेश मूर्तिंचे संकलन करून त्यांचे विसर्जन पोलीस ठाण्याअंतर्गत करणार असल्याचे सांगितले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT