जळगाव

निम-मांजरोद पुलाला तापी पाटबंधारेचा ठेंगा !

प्रा.हिरालाल पाटील

कळमसरे : अमळनेर तालुक्यातील जिव्हाळ्याचा व दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असलेला निम्न तापी प्रकल्पावर (Tapi project) जलसिंचन विभागाकडे (Department of Irrigation) आधारीत असलेला हा निम-मांजरोद पुल (Bridge) शासनाच्या मागील काळात मंजूर झाला होता. मात्र पुरेश्या निधीअभावी हा पूल तापी पाटबंधारे महामंडळाने (Tapi Irrigation Corporation) कायमचा रद्द केला आहे. तापी नदीवरील नियोजित निम-मांजरोद पुल बांधन्यात यावा यासाठी आज आमदार अनिल पाटील (MLA Anil Patil) यांना निवेदन देण्यात आले. ( tapi irrigation department canceled manjroda bridge)

तापी नदीवर पूल झाल्यास या मार्गाने शिरपूर- सेंधवा- इंदोर या भागात जाण्यासाठी सोयीस्कर होणार आहे. पुल व्हावा ही अनेक वर्षांपासूनची तालुक्यातील नागरीकांची मागणी आहे. हा पुल झाल्यास तालुक्यातील दळणवळनाच्या सोयी वाढणार आहेत.

मंजूर पुल निधीअभावी रद्द..

तापी पाटबंधारे महामंडळ अंतर्गत निम -मांजरोद पुलाला मंजूरी मिळाली होती.या अंतर्गत नीम ते मांजरोद अंतर्गत तापी नदीत मागील काळात अधिकाऱ्यांनी सर्वेही केला होता.यामुळे तालुक्यातील नागरिकांनी पुल होणार म्हणून समाधान व्यक्त केले होते. या पुलाच्या कामामुळे जळगाव धुळे, शिरपुर ते मध्यप्रदेश जाण्यासाठी मोठी सोय होणार असून अमळनेर तालुक्यात यामुळे दळन वळण्याच्या सोयी वाढणार आहेत. मात्र सदयस्थितित तापी पाटबंधारे महामंडळाने पुरेश्या निधीअभावी हा पुल कायमचा रद्द करण्यात आल्याने तालुक्यातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शासनाकडे पाठपुरावा करून रस्त्याला राज्य मार्गाचा दर्जा मिळवून पुलाचा प्रश्न मार्गी लावण्याचा या पंचवार्षीक मध्ये उदिष्ट आहे. व तो मी करेन असेही आश्वासन आमदार अनिल पाटील यांनी यावेळी दिले.

गावकऱ्यांनी आमदार पाटलांची घेतली भेट

निम - मांजरोद पुल हा तापी पाटबंधारे महामंडळ अंतर्गत न करता , सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर करण्यात यावा त्यासाठी ठोस निधीची तरतूद करून कामाची सुरुवात करून जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवावा.यासाठी आमदार अनिल पाटील यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी कपिलेश्वर संस्थानचे सचिव मगन पाटील, संदीप घोरपडे, भागवत पाटील, प्रा. अशोक पवार, धार येथील गणेश पाटील, अलीम मुजावर. मारवड येथील उमाकांत पाटील भागवत, एस. एम. पाटील. आर. पी. चौधरी. तुकाराम पाटील. छोटु पाटील, अॅड. राजेंद्र चौधरी, सुदाम पाटील आदी उपस्थित होते. या निवेदनावर नीम, मारवड, कळमसरे, पाडळसरे, गोवर्धन -बोरगांव, धार, बोरगांव, पाडळसरे, मांजरोद, शहापुर, तांदळी, आदी गावातील लोकप्रतिनिधीसह ग्रामस्थानी सह्या केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प; CSMT स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला

SCROLL FOR NEXT