aadivasi family home damage 
जळगाव

उघड्यावर आलेला संसार पाहून गहिवरले; शासकिय मदतीपुर्वी स्‍वतः घेतला पुढाकार

सुधाकर पाटील

भडगाव : उमरखेड (ता.भडगाव) येथील एका आदिवाशी कुटुंबाचे ऑगस्ट महिन्यात वादळी पावसात घर कोसळले होते. घरात झोक्यात असलेली दीड वर्षाची मुलगी मृत पावली होती. या कुटुंबाचा संसार अक्षरशः उघड्यावर आला. या घराची पाहणी करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार माधुरी आंधळे यांनी या कुटुंबाची विदारक स्थिती पाहिल्यावर त्यांना शासकीय मदतीव्यतीरिक्त मदत देण्याचे मनात निश्‍चय केला. त्यानुसार तहसीलदारासह इतर अधिकाऱ्यांनी घर बांधण्यासाठी एकत्रित ५१ हजाराची त्या कुटुंबाला मदत केली. 

ऑगस्ट महिन्यात उमरखेड परीसरात वादळी पाऊस झाला होता. त्यात उमरखेड येथील दिपक सोनवणे या आदिवाशी कुटुबांचे घर कोसळले होते. त्यात घरात झोक्यात असलेले दीड वर्षाची बालिका मृत पावली होती. घर पडल्याने हे आदिवासी कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले होते. घटनेची पाहणी करण्यासाठी तहसीलदार माधुरी आंधळे यांनी तेथे भेट दिली. तेव्हा या कुटुंबाची स्थिती पाहून त्यांना ही गहिवरून आले. शासकीय मदतीला मर्यादा असतात. म्हणुन त्यांनी 'त्या' कुटुंबाला धीर देत घर बांधण्यासाठी मदत करण्याचा निश्चय केला. त्यानुसार त्यांनी हा विषय पोलिस निरीक्षक धनंजय येरूळे, मुख्याधिकारी विकास नवाळे, बांधकाम विभागाचे उपअभियंता व्ही. बी. राजपूत यांना कुटुंबाला मदत देण्याबाबत मनोदय व्यक्त केले. 

अन्य अधिकारीही सरसावले
क्षणाचा विलंब न करता मदत देण्यासाठी अधिकारी पुढे सरसावले. याशिवाय निवासी नायब तहसीलदार रमेश देवकर, एस. एस. पाटील, रमेश तायडे, निलेश शेजवळ, तलाठी राहूल पवार, रत्नदिप माने सर्व मंडळधिकारी यांनीही मदत देऊ केली. या सर्वांनी ५१ हजार रूपये गोळा केले. ही मदत दिपक सोनवणे यांना सुपूर्द केली. यावेळी तहसीलदार माधुरी आंधळे, पोलिस निरीक्षक धनंजय येरूळे, मुख्याधिकारी विकास नवाळे, निवासी नायब तहसीलदार रमेश देवकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत पाटील, डॉ. प्रतिक पाटील, सोमनाथ पाटील, मंडळधिकारी रमेश तायडे, श्री येवले, संदिप बढे, चेतन राजपूत आदि उपस्थित होते. 

तहसीलदारांची सामाजिक बांधिलकी 
दरम्यान अधिकाऱ्यासाठी नैसर्गिक आपत्ती काही नविन नाही. नुकसानीचे पंचनामे होऊन त्यांना भरपाई दिले होते. मात्र वादळी पावसामुळे एक कुटुंब उघड्यावर आल्याने तहसीलदार माधुरी यांच्या मनाला भिडले. त्यांनी 'त्या' कुटुंबाला घर उभे करण्यसाठी मदत देण्याची मनाशी खुणगाठ बांधली. त्यांनी हा विषय तालुक्यातील अधिकाऱ्याकडे मांडला. त्यांनीही लगेच होकार देत मदत देऊ केली. आज त्या कुटुंबाला मदत देतांना हे सर्व अधिकारी ही उपस्थित होते. अधिकाऱ्याच्या या सामाजिक जाणिवेचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

संपादन ः राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT