girna river water 
जळगाव

पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात घातली दुचाकी अन्‌ क्षणात गेले; गिरणेत तिघांना जलसमाधी 

सकाळ वृत्तसेवा


भडगाव (जळगाव) : पिंपळगाव (ता. भडगाव) येथील एक २२ वर्षीय तरुण मित्रासमवेत बुधवारी (ता. २३) दुपारी एकच्या सुमारास गिरणा नदीपात्रात पोहण्यास गेला असता पुराच्या पाण्यात तो वाहून गेला, तर कासोदा येथील दोघे जण गिरड येथील पुलावरून दुचाकीसह वाहून गेल्याची घटना घडली आहे. दोन्ही घटनेत वाहून गेलेल्यांचा रात्री उशिरापर्यंत गिरणा नदीच्या पात्रात शोध सुरू होता. गिरणा नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे शोधकार्यात अडचणी येत आहेत. दरम्यान, वाहून गेलेल्या दुचाकीवरील दोघांपैकी तरुणाचा मृतदेह उत्राण हद्दीत सापडला आहे. 

पिंपळगाव (ता. भडगाव) येथील शेतकरी अशोक पाटील यांचा एकुलता मुलगा भूषण अशोक पाटील हा गावातील तीन ते चार मित्रांसमवेत गिरणा नदीत पोहण्यासाठी गेला होता. पिंपळगाव गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ हे सर्व पोहत होते. दरम्यान, पिंपळगाव येथे गिरणा नदीचे पात्र प्रचंड रूंद आहे. गिरणा धरणातून सोडलेले पाणी व भडगाव परिसरात दोन दिवसांपासून पावसाने लावलेली जोरदार हजेरी यामुळे गिरणा नदी दुथडी भरून वाहत आहे. हे सर्व मित्र नदीच्या पोहण्याचा आनंद लुटत असताना भूषण पाण्यातून बाहेर आलाच नाही. हे सोबत असलेल्या इतरांच्या लक्षात आल्यानंतर भूषणची शोधाशोध सुरू झाली. ग्रामस्थांनी थेट गिरडपर्यंत दोन्ही काठावर, तर पट्टीचे पोहणाऱ्या तरुणानी शोध घेतला. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरूच होती. 

दुचाकीसह दोघे वाहून गेले 
कासोदा येथील ख्यॉजाबाबा दर्गा परिसरातील तरुण चादरी विक्रीसाठी पाचोरा येथे गेला होता. मात्र, घराकडे परत येत असताना गिरड गावाजवळ गिरणा नदीवरील पुलावरून जात असताना तो पुरात वाहून गेला. पुलावरून तीन फूट पाणी वाहत असतानाही या दुचाकीस्वाराने पुलावर गाडी टाकल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. वाहून गेल्यानंतर त्याचा मृतदेह उत्राणजवळ दोन किलोमीटर अंतरावर आढळून आला. अयाजोद्दिन शफियोद्दिन (वय ३२, रा. कासोदा) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्यासोबत दुचाकीवर असलेले शेख कपूर शेख गुलाब (वर ५५) हे देखील वाहून गेले. त्यांचा रात्री उशिरापर्यंत शोध लागला नव्हता. दुचाकी पुलावरून वाहून गेल्याची घटना गावकऱ्यांनी प्रत्यक्ष बघितली. पण पुरामुळे त्यांना वाचवू शकले नाहीत. अयाजोद्दिनचा चुलत भाऊ निजामुद्दिन आजीमुद्दिन यांनी या तरुणाची ओळख पटविली असून, पोलिस पाटील प्रदीप तिवारी यांच्या उपस्थितीत कासोदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार भास्कर बडगुजर तपास करीत आहेत. 

‘सकाळ’ने दिला होता धोक्याचा इशारा 
गिरड गावाजवळील ओझर येथील गिरणा नदीवरील पुलाचे कठडे चार दिवसांपूर्वीच गिरणेच्या पुरात वाहून गेले होते. त्यामुळे हा पूल सताड उघडा पडला होता. दोन दिवसांपूर्वीच ‘सकाळ’ने या पुलाचे कठडे वाहून गेल्याचे सचित्र वृत्त मंगळवारी (ता. २२) प्रसिद्ध केले होते. पुलाच्या या स्थितीमुळे पावसाळ्यात वाहनधारकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता असल्याचा इशाराही या वृत्तात देण्यात आला होता. त्यावर प्रशासनाने आज तातडीने तात्पुरती का असेना प्रतिबंधात्मक उपाययोजना झाली असती, तर आज दुचाकी वाहून जाण्याची घटना घडली नसती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT