जळगाव

भुसावळ पून्हा हादरले; तरुणावर गोळीबार, चाकू हल्ला करून खून !

चेतन चौधरी

भुसावळ : शहरातील श्रीराम नगरातील बोंडे कटर जवळील भागातील रहिवाशी विलास दिनकर चौधरी या तरुणावर रात्री ११ वाजेच्या दरम्यान गोळीबार व चाकू हल्ला झाल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली.

सविस्तर वृत्त असे की, बोंडे कटर जवळील विलास चौधरी हा रात्री घराबाहेर फोनवर बोलत असतांना काळे कपडे घालून असलेल्या ५ ते ६ तरुणांनी अचनाक विलासच्या हाताचवर व पोटावर चाकूने वार केले. हल्ला झाल्याने विलास हा घरात पळत जाऊन दरवाजा बंद केला. तर सव्वा आकराच्या सुमारास पुन्हा तरुणांनी विलासच्या घराकडे येऊन दरवाजावर दगड फेक करून घराच्या मागील बाजूकडील दरवाज्याची कडी तोडून घरात प्रवेश करून गोळीबार केला. घटनेचे वृत्त समजताच, डीवायएसपी गजानन राठोड व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तरुणाला खाजगी दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

परिसरात घबराट
श्रीराम नगरात तरुणाचा खुन झाल्याची या थरारक घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थाळी पोलिस अधिकाऱयांनी पाहणी केली. या घटने प्रकरणी पोलिसांनी अक्षय न्हावकर, अभिषेक शर्मा, आकाश गणेश पाटील यांना ताब्यात घेतले आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव; यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Farmers: पंचनामे कागदावर नको, थेट बांधावर करा; महसूलमंत्री बावनकुळे यांचे निर्देश; ग्रामसेवक, कृषी साहाय्यक, तलाठींची उपस्थिती बंधनकारक

आजचे पंचांग 24 सप्टेंबर 2026! प्रदोषामुळे खास दिवस; वाचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Ahilyanagar Ganesh Visarjan : अहिल्यानगरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत लाठीचार्ज; तरुणाचा मृत्यू, आमदार संग्राम जगताप यांचे ठिय्या आंदोलन

Jharkhand Dhuska Recipe: एकदा खाल तर पोहे-उपमाही विसराल! असा बनवा बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ झारखंडी धुस्का

SCROLL FOR NEXT