जळगाव

रागाच्या भरात घरातून निघाली आणि भुसावळ स्टेशनमध्ये टी.सी स्टॉफच्या सतर्कतेमूळे सापडली 

चेतन चौधरी

भुसावळ: उत्तर प्रदेश मधील भदोली गावातील महिला सुरत मध्ये आपल्या पती व मुलांसोबत राहत असून, कुणालाही न सांगता रेल्वेने दुपारी भुसावळ रेल्वे स्थानकावर आली असता, टीसी स्टॉफ ने तिकीट विचारले. तिकीट नसल्याने महिलेस टिसी लॉबी मध्ये बसविले महिलेस विचारणा केली असता ती पळून आल्याची सत्यता समोर आली. टी.सी स्टॉफ सतर्कतेमुळे महिला लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले.  

उत्तर प्रदेशातील भदोली जिल्ह्यातील खुशबु योगेशसिंग (वय 20 ह.मु.कैलास चौकी,ईश्वर नगर,सुरत) मध्ये राहत असून पती सोबत भाडंण करून कुणालाही न सांगता रागाच्या भरात घरून निघून रेल्वेने भुसावळला आली. प्लॅटफॉर्म वर उतरली असता, टीसी स्टॉफ ने तिकीट विचारणा केली. मात्र तिकीट नसल्याने महिलेस टिसी लॉबी मध्ये बसविले. महिला टीसी यांनी महिलेची विचारणा केली असता ती घरून पळून आल्याची सत्यता समोर आली. याबाबत टीसी स्टॉफने एस.सी.एम. ए.के. पाठक यांना माहिती दिली असता रेल्वे सुरक्षा बल कार्यालयात मेमो देण्यास सांगितले.

रेल्वे सुरक्षा बलच्या उपनिरीक्षक दीपा सिंग यांनी भेट घेऊन मेमो घेण्यास नकार दिला. या बाबत एस.सी.एम. पाठक यांना कळविले असता त्यांनी कंट्रोल यांना सूचना देऊन सर्व माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले.तसेच टीसी स्टॉफला लोहमार्ग पोलीस स्टेशनच्या नावाने मेमो बनविण्याचे आदेश दिले.

त्यानुसार टीसी स्टॉफ लॉबीचे इंचार्ज शेख गोठले, नवनीत तिवारी, दीपाली बोबडे, मोहम्मद अकिल, एम.डी. फिरके, आयटीसीएओ सचिव निसार खान अशांनी रेल्वे सुरक्षा बलच्या दीपा सिंग व दोन कर्मचारी सोबत घेऊन महिलेस लोहमार्ग पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केले. टीसी स्टॉफ लॉबी ने मिळून लोहमार्ग पोलीस स्टेशनच्या निरीक्षकांच्या स्वाधीन केले. निरीक्षकांनीे सुरतला महिलेच्या परिवारास संपर्क साधला असता महिलेचे पती लवकरच भुसावळ स्टेशन गाठून महिलेस ताब्यात घेणार असल्याची माहिती टीसी स्टॉफने दिली.  

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT