जळगाव

'ग्लोबल रनिंग डे' : भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स ग्रुप गच्चीवर धावले !  

सकाळवृत्तसेवा

भुसावळ  : येथील भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या सदस्यांनि यंदा 'ग्लोबल रनिंग डे' आपापल्या गच्चीवर धावून साजरा केला. लॉकडाऊन व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा उपक्रम राबवावा लागल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण फालक यांनी सांगितले. 

जून महिन्याचा पहिला बुधवार हा ग्लोबल रनिंग डे जगभरात साजरा केला जातो .परंतु यावर्षी लॉकडाऊन मुळे जगभरातील धावपटूंना हा दिवस या वर्षी साजरा करता आला नाही.परंतु भुसावळ धावपटूंनी हा दिवस घराच्या गच्चीवर अथवा प्रांगणात धावून साजरा केला .भुसावळचे धावपटू शहरात दर मंगलवार, गुरूवार व रविवार धावण्याचा नियमित सराव करीत असतात व त्या शिवाय देशातील वेगवेगळ्या मँरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत असतात. परंतु लॉकडाऊन सुरू झाल्यापासून त्यांनी गच्चीवर धावण्याचा सराव सुरू केला .

त्याचबरोबर देशातील विविध संस्थांनी आयोजित केलेल्या ‘इंडोर व्हर्च्युअल रनमध्ये ‘त्यांनी सहभाग नोंदविला .त्यामुळे हा दिवस साजरा करण्यासाठी सर्व धावपटूंनी आपल्या गच्चीवर धावायला सुरुवात केली व अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा केला .प्रशासनातर्फे नजीकच्या काळात बाहेर धावायला परवानगी मिळू शकते परंतु त्याचबरोबर शहरात कोरोना रुग्णांची संख्या देखील सतत वाढत आहे त्यामुळे प्रत्येकाने घरी धावण्याचा सराव करावा व व्यायाम करावा असे आवाहन प्रवीण फालक व डॉ. तुषार पाटील यांनी केले आहे .या उपक्रमात स्वाती फालक, डॉ. चारुलता पाटील, गणसिंग पाटील, अशोक पाटील, सचिन मनवानी , दिपेश सोनार ,प्रवीण वारके ,रंजीत खरारे ,प्रदीप सोळंकी,प्रवीण पाटील आदी सदस्यांनी सहभाग नोंदविला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

Pali News : मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यात चक्क मगरींचा मुक्काम! कामगारांची समयसूचकता अन मगरींना मिळालं नवजीवन

RCB vs SRH Live : पहिल्याच सामन्यात वाद... हेनरिच क्लासन अम्पायरच्या निर्णयावर नाराज... काव्या मारनही भडकली, सॉल्टच्या कॅचवर शंका?

SCROLL FOR NEXT