जळगाव

'एक दुर्वा समर्पणाची' उपक्रमातून गरजू विद्यार्थ्यांना दिला मदतीचा हात

चेतन चौधरी

 भुसावळ : शहरात अंतर्नाद प्रतिष्ठानने गणरायाला 'एक दुर्वा समर्पणाची' उपक्रम राबविला. या वेळेस त्यांच्या सोबत उषा फाउंडेशन सुद्धा या उपक्रमात सहभागी झाली. गणेशोत्सवाच्या खर्चात बचत करुन दात्यांनी स्वेच्छेने दिलेल्या मदतीतुन गोरगरीब विद्दार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

निरंतर पाच दिवसापासून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचा समारोप जिल्हा परिषद शाळा मुशाळतांडा येथील आदिवासी वस्तीवर करण्यात आला. उपक्रमाची सुरुवात यावल तालुक्यातील बामणोद येथील जिप उर्दू शाळा येथून झाली, त्यात नंतर कोसगाव जि.प. शाळा, भुसावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मांडवेदिगर, महादेव माळ या शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि संत गाडगेबाबा यांनी दाखवलेल्या मार्गाने अंतर्नाद उषाची वाटचाल सुरु आहे. भविष्यात ह्या शैक्षणिक चळवळीला व्यापक स्वरुप यावे अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली.

कार्यक्रमास राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विजय पाटील हे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद राठोड, उपाध्यक्ष राजू राठोड, ग्रामपंचायत सदस्य शामराव राठोड,उषा फाऊंडेशनचे अध्यक्ष दिलीप जावळे,पांडुरंग महाजन, मुख्याध्यापक दीपक सुरवाडे आदी मान्यवर उपस्थित होते. भुसावळ प्राथमिक शिक्षक पतपेढी संचालक प्रदीप सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. प्रकल्प प्रमुख अमितकुमार पाटील यांनी प्रस्ताविक तर अंतर्नादच्या उपक्रमाविषयी समन्वयक निवृत्ती पाटील यांनी माहिती दिली. सह समन्वयक भूषण झोपे यांनी आभार मानले. या प्रसंगी माजी ग.स. संचालक योगेश इंगळे, उषा फाउंडेशनचे सचिव जिवन महाजन,-प्रविण मोरे, सौरव जावळे, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

दातृत्वाच्या दिंडीचे वारकरी
उपक्रमास (स्व.) शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ उषा पाटील यांनी तर, (स्व.)सोमा जावळे यांच्या स्मरणार्थ मालती जावळे यांनी शैक्षणिक साहित्य दिले. सोबतच हर्षद महाजन, रघुनाथ सोनवणे, किरण पाटील, किरण चौधरी, सचिन पाचपांडे, दीपक पाटील, लैलेश मास्टे, भूषण शेरीकर यांनीही सहकार्य केले.

दात्यांची संख्या वाढावी 
सण उत्सवाना सामाजीक उपक्रमांची जोड देउन राबविण्यात आलेला उपक्रम नक्कीच कौतुकास्पद असाच आहे. दात्यांच्या मदतीच्या माध्यमातून गरीब गरजवंत विध्यार्थी यांची शैक्षणिक साहित्याची गरज भागत आहे. दात्यांनी अश्या उपक्रमाना भरभरून मदत केली पाहिजे असे आदर्श शिक्षक विजय पाटील म्हणाले.
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

Income Tax Notice Scam : तुम्हालाही इन्कम टॅक्सची नोटीस आलीय ? आजिबात करु नका 'ही' चूक, होईल मोठे नुकसान

झाकीर खानची तब्येत बिघडली! मुंबईच्या लीलावती रुग्णालयात केलं भर्ती, नक्की झालं काय?

Uri Encounter: अफगाणिस्तानवर हल्ल्यानंतर पाकड्यांचा मध्यरात्री उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय सैन्याने जाग्यावरच केलं ठार!

धक्कादायक! आधीच टंचाई त्यात गॅस सिलिंडरची चोरी, ७६ चोरले पण फक्त १२ भरलेले...

SCROLL FOR NEXT