जळगाव

आयुध निर्माणीत बेमुदत संप अटळ; ९९ टक्के कर्मचारी संपाच्या बाजूने 

सकाळवृत्तसेवा

भुसावळ  : केंद्र शासनाने देशातील आयुध निर्माणीचे निगमीकरणाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय रद्द करण्यासाठी राष्ट्रीय संयुक्त संघर्ष समितीच्या आदेशानुसार देशव्यापी बेमुदत संपासाठी आज (ता. १०) आयुध निर्माणी कामगार युनियन च्या वतीने रेस्ट शेड येथे मतदान घेण्यात आले. सर्व कर्मचाऱ्यांनी सकाळी कामावर जाताना संपासाठी मतदान केले. सरकार आयुध निर्माणींचे निगमिकरण निर्णावर ठाम असल्याने कामगारांनी संपाचे बाजुने मतदान करून, सरकार विरोधी रोष प्रकट केला व अनिश्चित संपावर जाण्याचा निर्णय घेतला. 

येथील आयुध निर्माणीत कार्य प्रबंधक रामबंधु मिणा यांच्या नेतृत्वाखाली व कनिष्ठ कार्य-प्रबंधक एस. डी. भंगाळे यांचे निरिक्षणात, श्रम कार्यालयाचे नितीन सोनवणे, ओमप्रकाश स्वामी, नितीन लोखंडे, नविन गायकवाड, ए. एस. शेगोकारे, निलेश पाटील व सहयोगी स्टाफद्वारे मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. जळगाव जिल्ह्यातील उद्या (ता. ११) मजदुर युनियन इंटक व शुक्रवारी  (ता. १२) आयुध निर्माणी कर्मचारी संघाच्या वतीने मतदान घेण्यात येईल. मतदान यशस्वी करण्यासाठी संयोजक दिनेश राजगिरे, प्रकाश कदम, एम. एस. राऊत यांच्या मार्गदर्शनात आयुध निर्माणी कामगार युनियन व स्थानिक संयुक्त संघर्ष समितीचे पदाधिकारी किशोर पाटील, दीपक भिडे, प्रविण मोरे, निलेश देवराळे, जितेंद्र आंबेडकर, हिरालाल पारिसकर, नाना जैन, राजकिरण निकम, मिलिंद ठोंबरे, ज्ञानदेव सरोदे, मामा बाविस्कर आदींचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या भावात घसरण! सणासुदीत 10 ग्रॅमचा भाव किती? पाहा ताजा दर

America Car Culture : अमेरिकेत मर्सिडीज-बीएमडब्ल्यू पाहून श्रीमंत समजू नका! भारतीय तरुणाने सांगितलं धक्कादायक वास्तव, पाहा VIRAL VIDEO

Dusseldorf Ganeshotsav : ड्युसेलडॉर्फमध्ये गणरायाची भव्य मिरवणूक; ढोल-ताशांच्या गजरात रंगला मराठमोळा उत्सव

Marathi News Live Updates : आशियाई क्रीडा स्पर्धेत हिमांशू ढिल्लनला रौप्य, तर रुद्रांक्ष पाटीलला कांस्य पदक

IND vs WI, ODI: रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्ध घालणार धुमाकूळ? सचिन, डिविलियर्सचे विक्रम मोडण्याची संधी

SCROLL FOR NEXT