murder case
murder case 
जळगाव

दर महिन्याला होतोय भुसावळात खून; नगरसेवक हत्‍याकांडाने खळबळ

चेतन चौधरी

भुसावळ (जळगाव) : कामगारांचे शहर अशी ओळख असलेल्या भुसावळची वाटचाल आता गुन्हेगारीकडे सुरू असून, शहरात गेल्या दीड वर्षात तब्बल १५ खुनाच्या घटना घडल्या आहेत. वाढत्या खुनाच्या घटना लक्षात घेता गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक संपल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षेची भावना वाढू लागली आहे. 
धक्कादायक बाब म्हणजे २०१९ मध्ये विविध सात घटनांमध्ये तब्बल ११ जणांना हल्लेखोरांनी यमसदनी धाडले. यातील चार खून शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाले आहेत. मात्र, २०२० मध्येही खुनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, मार्च ते ऑक्टोबरदरम्यान चार जणांचे खून झाले आहेत. अशा एकूण ११ घटनांमध्ये १५ जणांचा खून झाल्याच्या घटना गेल्या दीड वर्षात घडल्या आहेत. 

भाजप नगरसेवकाच्या हत्याकांडाने खळबळ 
शहरातील समतानगरात बेधुंद गोळीबार करण्यात आला. यात भाजपचे तत्कालीन नगरसेवक रवींद्र खरात, सुनील बाबूराव खरात, प्रेमसागर रवींद्र खरात, रोहित ऊर्फ सोनू खरात व सुमीत संजय गाजरे या पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. अवघ्या १५ मिनिटांत एवढे मोठे हत्याकांड झाल्यामुळे शहरात नव्हे तर राज्यात खळबळ उडाली होती. या हत्याकांडाची दखल घेऊन केंद्रीय मंत्री रामदास आठवले हेही शहरात दाखल झाले व या घटनेची सीआयडी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. 
 
गेल्या दीड वर्षातील खुनाच्या घटना 
२५ मार्च २०१९ : डी. एस. ग्राउंडवर जय अशोक दुधानी यांचा खून. 
१० एप्रिल २०१९ : डॅनियल जॉर्ज या रेल्वे कर्मचाऱ्याचा पिस्तुलामधून गोळी झाडून घरातच खून. 
१४ एप्रिल २०१९ : हुडको कॉलनीत प्रीती ओंकार बांगर या तरुणीचा चाकूने भोसकून खून. 
१५ एप्रिल २०१९ : शहर पोलिस ठाणे हद्दीत सरला अशोक भांडारकर या वृद्ध महिलेचा खून. 
८ जुलै २०१९ : योगेश प्रल्हाद पाटील (रा. गंगाराम प्लॉट) या तरुणाच्या खुनामुळे खळबळ. 
३१ ऑगस्ट १०१९ : पांडुरंग टॉकीजशेजारील एका हॉटेलमध्ये दोन सेकंदांत रेल्वे गँगमन विकास वासुदेव साबळे यांची गळा चिरून हत्या. 
६ ऑक्टोबर २०१९ : समतानगरमध्ये बेधुंद गोळीबारात भाजपचे तत्कालीन नगरसेवक रवींद्र खरात, सुनील बाबूराव खरात, प्रेमसागर रवींद्र खरात, रोहित उर्फ सोनू खरात व सुमीत संजय गाजरे या पाच जणांची निर्घृण हत्या. 
२ मार्च २०२० : कोळीवाड्यात भरदिवसा साकेगाव येथील दूध व्यवसाय युवक नसीर बशीर पटेल या युवकाचा डोक्यावर रॉडने वार करीत खून. 
२५ ऑगस्ट २०२० : श्रीरामनगरातील विलास दिनकर चौधरी या तरुणावर पाच ते सहा तरुणांनी जुन्या वादातून घरात घुसून चाकूहल्ला करून गोळीबार केला होता. 
१३ सप्टेंबर २०२० : खडका रोडवरील एका पुलाजवळ शेख अल्तमश शेख रशीद (रा. बाबला हॉटेल, कमलाबाई बिल्डिंग) याचा हल्लेखोरांनी त्याच्या छातीवर चाकूने वार करून खून केला होता. 
११ ऑक्टोबर २०२० : पंचशीलनगरातील मदिना मशिदीजवळ घराबाहेर बसलेल्या मोहम्मद कैफ शेख जाकिर याचा डोक्यात रॉड टाकून खून. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : आप आमदाराच्या मुलाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT