जळगाव

शौर्य गाजवूनही शासनाकडून बेदखल; अजून ही कायम नोकरीच्या शोधात

चेतन चौधरी

भुसावळ : स्वतःचा लहानगा मुलगा आणि पती यांचा जीव धोक्यात घालून आणि जीवावर उदार होऊन प्रवाशाचा प्राण वाचविला. मात्र मी अजूनही कायम नोकरीच्या शोधात आहे. अजूनही मी कार्यरत असलेल्या विभाग, गृह विभाग आणि राज्य शासनाने सत्कारापलीकडे कोणतीही दखल घेतली नसल्याची खंत व्यक्त करीत, शौर्य गाजवणाऱ्या व्यक्तींना पोलीस भरतीत प्राधान्य क्रमाने नियुक्ती द्यावी अशी मागणी लता बोरीकर यांनी येथे आहे.

लता निरंजन बोरीकर ह्या महाराष्ट्र सुरक्षा बल मुंबई येथे कार्यरत असून, मुंबई येथे रेल्वे रुळावर पडलेल्या प्रवाशाला आपला जीव धोक्यात घालून, लता बोरीकर यांनी वाचविले. याबद्दल शिवसेनेच्या वतीने झाशीची राणी प्रतिमा भेट देऊन रावेर लोकसभा जिल्हा संघटक विलास मुळे व उपजिल्हा प्रमुख प्राध्यापक उत्तम सुरवाडे यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. 

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, मी गाजवलेल्या शौर्या बद्दल भुसावळ शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातर्फे संपन्न झालेला सत्कार हा माझा तेविसावा सन्मान आहे. भुसावळ माझं सासर असून इथला सत्कार मला माहेरचा वाटतो. आपल्या माहेरात आपल्या जिव्हाळ्याच्या लोकांमध्ये झालेला सत्कार शब्दात सामावणे अशक्य आहे असे भावोद्गार लता बोरीकर त्यांनी काढले. यावेळी उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख एडवोकेट श्याम श्रीगोंदेकर, उपजिल्हाप्रमुख प्रा उत्तम सुरवाडे, शहर प्रमुख नीलेश महाजन, शहर प्रमुख बबलू बराटे, माजी नगरसेवक दीपक धांडे, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, तालुका संघटक प्रा धीरज पाटील, माजी शहरप्रमुख नामदेव बराटे, नीरज बोरीकर, ज्येष्ठ शिवसैनिक शरद जोहरे, प्रसिद्धी प्रमुख गोकुळ बाविस्कर आदी उपस्थित होते.

शासनाकडून बेदखल
बोरीकर म्हणाल्या की, आज सत्कार स्वीकारताना माझ्या एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहेत. कारण मी माझा स्वतःचा लहानगा मुलगा आणि पती यांचा जीव धोक्यात घालून आणि जीवावर उदार होऊन त्या प्रवाशाचा प्राण वाचविला होता. मात्र मी अजूनही कायम नोकरीच्या शोधात आहे. अजूनही मी कार्यरत असलेल्या विभाग, गृह विभाग आणि राज्य शासनाने सत्कारापलीकडे कोणतीही दखल घेतली नाही. शौर्य गाजवणाऱ्या व्यक्तींना पोलीस भरतीत प्राधान्य क्रमाने नियुक्ती द्यावी अशी माझी मागणी आहे. जेणेकरून असा पराक्रम गाजवणाऱ्या व्यक्तींना बळ मिळेल. शिवसेना परिवार माझ्या पाठीशी उभा राहून जर शासन स्तरावर पाठपुरावा केला तर मला व माझ्यासारख्या इतरांना निश्चितपणे न्याय मिळेल असा विश्‍वास व्यक्त केला. याप्रसंगी त्यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षाला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दुजोरा देत प्रा उत्तम सुरवाडे यांनी पाठपुरावा करण्यासंबंधी आश्वासित केले.  

 संपादन- भूषण श्रीखंडे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! विमानतळावरून १५ नवीन विमानांची उड्डाणे; कुठे आणि कधीपासून? जाणून घ्या...

Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघात पदार्पणाची संधी द्यायला हवी का? ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणतो, अरे त्या पोराला खेळू द्या...

Pune Crime : सासरच्या छळाला कंटाळून महिलेने संपविले जीवन; सासरे व दिराविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Water Supply News : शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी सुरळीत राहणार

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

SCROLL FOR NEXT