Drowned 
जळगाव

देवासारखा धावून आला जीवरक्षक..आणि वाचविले तरुणाचे प्राण

तरुण पाण्यात बुडत असतांना जीवरक्षकांना दिसताच त्यांनी तातडीने पाण्यात उडी घेतली.

सकाळ वृत्तसेवा


भुसावळ : गणपती बाप्पाला रविवारी सर्वत्र (Ganesh Visarjan) निरोप दिला जात असतांना तापी नदीपात्रात एक गणेशभक्त पाय घसरून पडला. आणि तापीनदीत हा तरुण बुडत (Drowned) असतांना हद्दीच्या वादात न पडता माणुसकीचे दर्शन घडवत देवासारखी धाव घेत जीवरक्षक पथकाने बोट घेऊन धाव घेतली व क्षणात त्या गणेशभक्ताचे प्राण वाचवून पात्रातून सुखरुप बाहेर काढले.


गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार तापी नदीपात्रात वन्यजीव संरक्षण संस्थेच्या प्रशिक्षित जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, गणपती विसर्जनाच्या वेळेस भूषण प्रभाकर इंगळे (वय ३५) (रा. गोदावरी कॉलनी) हा रेल्वे कर्मचारी यावल परिसरात तापी नदीपात्रात पाय घसरून पाण्यात पडले.

जीवरक्षकांनी पाण्यात उड्या घेतल्या..

तरुण पाण्यात बुडत असतांना जीवरक्षकांना दिसताच त्यांनी तातडीने पाण्यात उडी घेतली. ट्यूब घेऊन पाण्यात उतरलेल्या व्यक्तीपर्यंत सुरेंद्र धौसले व सुमेंद्र धौसले हे दोघे बंधू (रा.टिंबर मार्केट) या महाकाल म‍ंडळाच्या सदस्यांनी आणून सोडले. आणि व्यक्तीस वाहून जाण्यापासून रोखून धरले व त्याच्यावर प्रथमोपचार केले.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंह रावळ यांच्या नेतृत्वाखाली पथकात सामील असलेले संस्थेचे सदस्य सतीश कांबळे, स्कायलेब डीसुजा, चेतन बोरनारे, मेनुल फर्नांडिस, आशिष अलोटकर, एलेंन मेसन यांनी कर्तव्य बजावले. याप्रसंगी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पालिका मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, पालिकेचे अकाउंट सुदर्शन शमनानी, वैभव पवार यांनी त्या व्यक्तीची विचारपूस करून त्यास मानसिक आधार देत, वैद्यकीय तपासणीसाठी पालिका रुग्णालयात पाठवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray targets Mumbai Mayor : बांगलादेशी घुसखोरांवरून आदित्य ठाकरेंचा मुंबईच्या महापौरांना टोला अन् भाजपला सवाल, म्हणाले...

Valentine Day 2026 Marathi Wishes: 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त तुमच्या प्रेमळ व्यक्तीला पाठवा हृदयस्पर्शी शुभेच्छा, प्रेमाचा दिवस बनेल स्पेशल

Indian Passport Ranking : भारतीय 'पासपोर्ट रँकिंग'मध्ये मोठी सुधारणा!, आता ५६ देशांमध्ये 'Visa-Free' एन्ट्री करता येणार

USA vs NED : अमेरिकेच्या विजयात पुणे, मुंबईचे खेळाडू चमकले; नेदरलँड्सचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर, अ गटाचे चित्र स्पष्ट

अभ्यास करा..! पाचवी अन्‌ आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारीला; परीक्षेत दोन पेपर, १५० गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न, वाचा...

SCROLL FOR NEXT