Mahanirmiti
Mahanirmiti 
जळगाव

परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरीपासून वंचित; महानिर्मितीच्या भरतीचा प्रश्‍न

चेतन चौधरी

भुसावळ (जळगाव) : महाराष्ट्र शासनाने महावितरण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक पाच हजार व उपकेंद्र सहाय्यक पदाकरिता दोन हजार अशा एकूण सात हजार पात्र उमेदवारांच्या अर्ज बोलावण्यात आले होते, यासाठी परीक्षा देखील घेण्यात आली. आता याचा निकाल लागला असून, कागदपत्रे पडताळणीची तारीख वारंवार रद्द होत असल्याने उत्तीर्ण उमेदवारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

महावितरणतर्फे जुलै २०१९ मध्ये काढण्यात आलेल्या नोकर भरतीत महाराष्ट्रातील लाखो आयटीआय धारकांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरले होते. ऑगस्ट २०१९ रोजी चाचणी परीक्षा घेण्यात आली. मात्र परीक्षा देऊनही वर्षभरानंतर विद्यार्थ्यांना निकाल मिळाला नव्हता त्यामळे महाराष्ट्रातील लाखो आयटीआय धारकामध्ये संतापाची लाट पसरली होती. सदर परिक्षाचा निकाल एक वर्षांपासून स्थगित होता. तो निकाल जून २०२० मध्ये जाहीर झाला असून, आता कागदपत्रे पडताळणीसाठी वारंवार तारखेत बदल होत असल्याने परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार अद्यापही नोकरिपासून वंचित आहेत.

निकलातही झाली दिरंगाई
महावितरण कंपनीतील जुलै २०१९ मध्ये दोन हजार उपकेंद्र सहायक, पाच हजार विद्युत सहायक भर्ती निघाले होती. ऑगस्ट 2019 रोजी चाचणी परीक्षा घेण्यात आली सदर परिक्षाचा निकाल एक वर्षांपासून स्थगित होता. उपकेंद्र सहायक पदाची निवड व अतिरिक्त यादी लावुन कागद पडताळणीसाठी अगोदर १६, १७ ऑगस्ट तारिख दिली. मात्र ही तारीख रद्द करून पुन्हा १५ आणि १६ सप्टेंबर तारीख देण्यात आली, सोबत जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय चाचणी घेण्यात सांगितले होते. परंतु महावितरण प्रशासनाने ही कागदपत्र पडताळणी प्रक्रिया स्थगित करण्याचे जाहीर केले.

विद्यार्थ्यांमध्ये नैराश्यची भावना
आताची परिस्थिती लक्षात घेता, कोरोना महामारीमुळे बऱ्याचश्या मुलांचा रोजगार हिरावला गेला आहे. वारंवार भर्तीवर स्थगिती येत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्यची भावना निर्माण होत आहे. लाखो विद्यार्थ्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे. आयटीआयधारकांच्या हाताला काम नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करून भरतीला प्राधान्य द्यावे. सोबतच बेरोजगारांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT