जळगाव

ऑनलाइन वेबिनारमच्या ज्ञानातून...दिव्यांग शिक्षिकेने साकारले ‘फ्लिफबुक’ 

शंकर भामरे

पहूर  : लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने ऑनलाइन वेबिनारमध्ये सहभागी होत मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करत विद्यार्थ्यांसाठी साकारलेय ‘फ्लिपबुक’. तेही दिव्यांग शिक्षिका कीर्ती बाबूराव धोंगडे यांनी. 


जामनेर तालुक्यातील पहूर-कसबे येथील जिल्हा परिषद कन्या शाळेतील उपक्रमशील शिक्षिका कीर्ती घोंगडे. दिव्यांगावर मात करून त्यांनी शिक्षणशास्त्रातील पदव्युत्तर पदवी संपादन करीत ऑनलाइन शिक्षणप्रक्रियेत स्वतःला झोकून दिले अन्‌ तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘फ्लिफबुक’ साकारले. तसेच शाळेची माहिती करून देणारी ‘मी सावित्री’ या माहिती पुस्तिकेचीही त्यांनी मांडणी केली आहे. सुंदर चित्र, सहज समजणारी भाषाशैली यामुळे हे फ्लिफबुक चांगलेच वाचकप्रिय झाले आहे. त्यांच्या या अभिनव उपक्रमाबद्दल जामनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे केंद्रप्रमुख भानुदास तायडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाबूराव पवार, मुख्याध्यापक एस. आर. कोळी, माजी पंचायत समिती सभापती बाबूराव घोंगडे यांनी त्यांचे अभिनंदन केले. 

काय आहे ‘फ्लिफबुक’ 
फ्लिफबुक ऑनलाइन पुस्तक असून, विद्यार्थ्यांसाठी सहज हाताळण्याजोगे असे शैक्षणिक साहित्य आहे. मोबाईलच्या स्क्रीनवर बोटांनी सहज स्पर्श करताच त्याची पाने उलटतात. विद्यार्थ्यांना पुस्तक वाचताना आनंद वाटतो. आनंददायी पद्धतीने शिकण्याचा एक सहजमार्ग म्हणून ‘फ्लिफबुक’कडे पाहिले जाते. 


संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT