जळगाव

लॉकडाउनमध्ये आयुध निर्माणीचाही सहभाग

१५ ते ३० एप्रिलदरम्यान केवळ आयुध निर्माणीच्या वसाहतीत राहणाऱ्या कामगारांना कामावर यावे लागेल.

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउन जाहीर केले आहे. यात आता आयुध निर्माणीचाही सहभाग राहणार आहे. त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या ‘ब्रेक द चेन’ मोहिमेंतर्गत सुरू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये वरणगाव व भुसावळ आयुध निर्माणीचाही सहभाग राहणार आहे.

केवळ आयुध निर्माणी वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कामावर जावे लागणार आहे. १५ ते ३० एप्रिलदरम्यानच्या काळासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने १३ एप्रिलच्या आदेशानुसार निर्बंध दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आयुध निर्माणी भुसावळचे महाप्रबंधक वसंत निमजे व वरणगाव येथील महाप्रबंधक एस. के. राऊत यांनीही आयुध निर्माणीच्या कामकाजावर निर्बंधांचे आदेश बुधवारी काढले. या आदेशानुसार १५ ते ३० एप्रिलदरम्यान केवळ आयुध निर्माणीच्या वसाहतीत राहणाऱ्या कामगारांना कामावर यावे लागेल. तर उर्वरित बाहेर राहणाऱ्‍या कामगारांना गरजेनुसार सेक्शनप्रमुख बोलावेल त्या वेळी कामावर यावे लागेल. कर्मचाऱ्यांची संख्या नियंत्रणात राहण्यासाठी हे निर्बंध आहेत. दरम्यान, वरणगाव व भुसावळ आयुध निर्माणीतील दवाखाना, अग्निशमन केंद्र, वीजपुरवठा, पाणीपुरवठा आदी आपत्कालीन विभाग सुरू असतील. वसाहतीच्या बाहेर किंवा शहरात राहणाऱ्या कामगारांनाही सेक्शन.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT