जळगाव

पोलिस अधीक्षकांची ‘सरप्राईज व्हिजिट’; शस्त्र तस्करांच्या मुळावर घाव घालणार !

चेतन चौधरी

 भुसावळ  : शहर व तालुक्यात गावठी बंदुकी, पिस्तूल, तलवार, चाकू बाळगणाऱ्यांसह खुनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच गुन्हेगारांकडून शस्त्रसाठा मिळून येत असल्याने आमचे मुख्य टार्गेट त्यांच्या मुळाशी जाऊन त्यावर घाव घालण्याचे आहे. हा सर्व साठा मध्यप्रदेशात तयार केला जात आहे. त्या तयार करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे जिल्ह्या पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी सांगितले. त्या अनुषंगाने तपास केला जाणार आहे. 

भुसावळ शहरातील पोलीस स्टेशनला जळगावचे नूतन जिल्ह्य पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी पहिल्यांदाच भेट देऊन शहरातील गुन्हेगारी संदर्भात माहिती जाणून घेतली. तसेच पोलीस ठाण्यात किती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. किती गुन्हे उघडकीस करण्यात आले आहे. तसेच हद्दपार केलेले किती आरोपी आहेत. गुन्हेगारांचे किती प्रस्ताव हद्दपारसाठी पाठविण्यात आलेले आहेत. याबाबत भुसावळ शहरातील पोलीस ठाण्याला एस.पी.नी "सरप्राईज व्हिजिट" देऊन पोलीस ठाण्याचा आढावा घेतला. 

शहर व तालुक्यातील पोलीस ठाण्यात किती कर्मचारी आहेत. पोलीस ठाण्याच्या व कर्मचाऱ्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या. तसेच कोरोनाच्या काळात जीवाची पर्वा न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची चौकशी केली. शहरातील गुन्हे संदर्भात घटना कशा नियंत्रणार आणता येईल यावर पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. 

गुन्हेगारांशी संबंध ठेवणाऱ्या पोलिसांवर कारवाई करणार 
ज्या पोलिसांचे गुन्हेगारांशी सबंध आहेत, त्यांच्यावर लवकरच कारवाई केली जाईल. तसेच गुन्हेगारांसोबत पोलिसांचे वाढदिवस साजरा करण्यात आले आहेत. त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. जिल्ह्यातील अवैध धंदे वाल्याची गय केली जाणार नसून कुठल्याही अवैध धंदे वाल्याना थारा देण्यात येणार नसून, सततची निरंतर कारवाई केली जाणार आहे. 

बँक माफियांच्या विरुद्ध कारवाई 
बँक माफियांच्या विरुद्ध अनेक तक्रारी येत असून बँक मॅनेजरांना धमकविण्याचे प्रकार समोर आले असून खोटे प्रकरण करणार्या टोळीचा लवकरच पर्दाफाश केला जाणार असून त्यांची चौकशी करून लवकरच कारवाई करणार असल्याची माहिती जिल्ह्या पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी दिली.  

 
संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२८ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट इतिहासात घडणार दुर्मिळ क्षण? एकाच दिवशी दोन देशात कसे खेळणार भारतीय संघ

Vadodara Mumbai Expressway : महाराष्ट्रातून दिल्ली अन् जयपूर गाठणे होणार सोपे! वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेचा 'हा' मार्ग वाहतुकीसाठी सज्ज; PM मोदींच्या हस्ते उद्घाटन

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

SCROLL FOR NEXT