tapi river 
जळगाव

खेकडे पकडण्यासाठी गेले...अचानक आला तापीला पूर अन्‌ सुरू झाला थरार

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ (जळगाव) : शहराजवळील साकेगाव जवळ तापी पात्रात पाणी नसताना खेकडा पकडण्यासाठी गेल्यानंतर अचानक पात्रामध्ये हतनुर धरणातून पाणी सोडल्याने प्रभाव वाढला. नदी पात्राच्या मध्यभागी अडकलेल्या दोन युवकांना साकेगावच्या युवकांनी सिनेस्टाईल  दोरीच्या सहाय्याने नदीपात्रातून वाचवून जीवनदान दिले. 

साकेगाव (ता. भुसावळ) येथील एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या खालील बाजूस तापीनदी पात्रात भुसावळ येथील गजानन मंदिराजवळ वास्तव्यास असणारे जेतरम सिताराम बारेला व हिरालाल प्रेमसिंग बारेला हे दुपारी दीड वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे खेकडे पकडण्यासाठी गेले असता, त्यावेळेस नदीपात्रात गुडघे एवढेच पाणी होते. मात्र सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे हतनुर धरणातून ३६ दरवाजे उघडून पाण्याचा मोठा विसर्ग करण्यात आला. दुपारच्या वेळेस दोन तासानंतर तापीपात्र खळखळून वाहू लागले व अचानक  युवकांना अंदाज आला की, ते पाण्यात अडकले. त्यांनी पात्रातील उंच खडकावर जीव वाचवण्यासाठी आश्रय घेतला. 

साकेगावकर धावले मदतीला
पाणीपातळी वाढत असल्याने ते घाबरलेल्या स्थितीत आरडाओरडा करू लागले. त्याच वेळेस साकेगावचे शेतकरी विजय भोळे यांनी त्यांना बघितले व तातडीने  गावातील काही तरुण युवकांना माहिती देऊन सोबत दोर आणले. साकेगावात पोहण्यात तरबेज असलेले मंगल कोळी व देविदास चरहाटे यांनी क्षणाचाही विलंब न करता, युवकांना जवळ जाण्याचा प्रयत्न केला. पट्टीचे पोहणारे मंगल कोळी  यांनी दोरीसह पाण्यात घेत मुलांपर्यंत घेऊन मुलांपर्यंत पोहोचले. त्यांना किनाऱ्यावर रोशन, कोळी, भूषण कोळी, मुकेश कोळी, ग्रा. प. सदस्य प्रवीण पवार, जितेंद्र पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी हिम्मत देत दोरी खडकाला बांधली. 

बराचवेळ चालला थरार
अगदी सिनेस्टाईल एखाद्या सिनेमाला शोभेल अशा पद्धतीने उंच खडकावर अडकलेल्या युवकांना दोरीच्या सहाय्याने तब्बल ३० फुटापर्यंत हिम्मत देत बाहेर काढले व त्याच दोराचा आधार घेत शेवटी कोळी हेसुद्धा सुरक्षित किनाऱ्यावर आले. तेव्हा सर्व उपस्थितांनी एकच जल्लोष केला व दोन युवकांचा जीव वाचला. याचे समाधान  सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होते. भेदरलेल्या युवकांना साकेगाव ग्रामस्थांनी आधार देत घरापर्यंत भुसावळला सोडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

72-Year-Old Paragliding : आजोबांनी Gen-Z लाही लाजवलं ! वयाच्या ७२व्या वर्षी घेतली आकाशात झेप, २४ हजार फूट उंचीवरून पॅराग्लायडिंग, VIDEO VIRAL

IND vs AFG 3rd T2OI: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... श्रेयस अय्यरने Playing XI मध्ये केलाय एक बदल; जाणून घ्या संघ

Crime News: धक्कादायक! चार वर्षीय चिमुकलीसोबत ८५ वर्षीय वृद्धाचे अश्लील कृत्य, डोंबिवलीत संतापाची लाट

Latest Marathi News Update : पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी आरोपी सैफुल्ला उर्फ ​​साजिद जट्ट याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Kasari Power Protest: गणेशोत्सवात अखंडित विजेसाठी कासारी ग्रामस्थांचे महावितरणला साकडे; पोतराज आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT