जळगाव

हतनूरने गाठली धोक्याची पातळी; तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

चेतन चौधरी

भुसावळ : शहरासह तालुक्यात आज (ता. 10) सकाळी मुसळधार पावसामुळे नदी-नाले वाहून निघाले. हतनूर धरण परिसरात झालेल्या पावसामुळे धोरणाने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे तापी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भुसावळ तालुक्यात आज सकाळी साडेआठ पासून पावसाला सुरुवात झाली. पाहता पाहता पावसाने वेग धारण करीत, साडेदहा पर्यंत मुसळधार पावसाने सर्वत्र झोडपून काढले. यामुळे शहरातील रस्ते जलमय होऊन, सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. खडका रोड, मरीमाता मंदिर ते पांडुरंग टॉकीज, जुना सातारा परिसरातून वाहणाऱ्या बलबलकाशी नाल्यास पूर येऊन नालाही खळाळून वाहू लागला. या नाल्यामध्ये कचरा अडकल्याने पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला. त्यामुळे खडका रोड भागात रस्ते पाण्याखाली गेले होते. येथून काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र पाणी ओसरल्यावर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

नदीकाठी कोसळली दरड
सकाळी सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तापी नदी काठलगत असलेल्या राहुल नगर परिसरात दरड कोसळली. सुदैवाने मात्र याठिकाणी कुणीही नसल्याने दुर्घटना टळली. हा परिसर नदीकाठी खोलगट भाग असल्याने रहिवाशांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने अडचणींचा सामना करावा लागला.

नदीकाठी अलर्ट
हतनूर धरणाची धोका पूर्वपातळी 213 मी. असून आज झालेल्या पावसामुळे धरणाची पाणी पातळी 213 मी. इतकी झाली आहे. पावसामुळे बहात्तर तासांमध्ये तापी नदी पात्रात हतनूर धरणांमधून अचानक पाणी प्रवाह सोडण्यात येऊ शकतो. तरी पुढील बहात्तर तासापर्यंत हतनूर धरणाचे खालील गावांमध्ये सूचना देऊन तापी नदी पात्रांमध्ये कुणीही गुरेढोरे सोडू नये, अथवा कोणी तापीनदी पात्रांमध्ये जाऊ नये याकरिता प्रत्येक गावात दवंडीद्वारे सूचना देण्याचे आवाहन हतनूर धरण प्रशासनाने केले आहे.

दोन तासात 148 मिमी पाऊस
आज सकाळी मुसळधार पाऊस झाला. यात तालुक्यातील वरणगाव महसूल मंडळात 17मिमी, भुसावळ मंडळात 95.8 मिमी, कुरहे प्र. न. 15 मिमी, पिंपळगाव 22 मिमी अशा एकूण 148.8 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत 609.99 मिमी पाऊस झाला आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR Return : आयकर विभागाचा करदात्यांना इशारा! 31 डिसेंबरनंतर थेट 5,000 दंड; ITR मध्ये चूक असेल तर आत्ताच हे करा

Latest Marathi News Live Update : मूदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

Tulsi Puajn Diwas 2025: आज तुळशी पूजनाचा खास दिवस! ‘हे’ उपाय केल्यास घरात नांदेल सुख-समृद्धी

Satara Crime: इन्स्टाग्रामवरील मैत्री आली अंगलट! कास पठार फिरवण्याच्या बहाण्याने बोलवलं अन् नंतर असं काही घडलं की...

Viral Memes : कोल्ड प्ले किस, महाकुंभ मोनालीसा ते इंडियन बजेटपर्यंत...2025 वर्षांत व्हायरल झाले टॉप 10 मिम्स, हसून हसून पोट दुखेल

SCROLL FOR NEXT