भुसावळ : गणेश विसर्जनासाठी तापी पात्रात गेलेले चार तरुण नदीपात्रात बुडल्याची घटना मंगळवारी (ता. १) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास घडली. यात दोघा तरुणांचा बुडून मृत्यू झाला तर इतर दोघा तरुणांना वाचविण्यात यश आले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भुसावळातील शनी मंदिर वॉर्डातील युवक श्री विसर्जनासाठी झेडटीसी जवळ स्मशानभूमीसमोरील रेल्वे पुलाखाली गेले होते. याचवेळी पाण्याचा अंदाज न आल्याने चौघा तरुणांचा पाण्यात तोल जाऊन ते नदीपात्रात बुडाले. त्यातील धीरज संजय शिंदे (वय 21) आणि किरण विश्वास मराठे (वय 26) या दोघांना लागलीच वाचविण्यात यश आले. त्यांना लागलीच खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर इतर दोघांचे मृतदेह सकाळी आढळून आले असून, यात उपेंद्र गुलाब चौधरी (वय 19, शनी मंदिर वॉर्ड) व वैभव संजय शिंदे (वय 19, शनी मंदिर वॉर्ड) अशी मयत तरुणांची नावे आहेत. मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घटल्यामुळे दोघा तरुणांचे मृतदेह शोधण्यास उशीर झाला. सकाळी हे मृतदेह आढळून आले असून, दोघा तरुणांच्या मृत्यूने शनी मंदिर वॉर्डात शोककळा पसरली आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.