जळगाव

रस्ता खेड्यात गेल्यामुळे शिवसैनिकाचे लोटांगण आंदोलन 

अमोल आमोदकर

जळगाव ः बोदवड शहरामधून जाणारा साळशिंगी, भानखेडा हा रस्ता रस्त्यावर खरेदी रस्त्यात खडा हेच समजत नाही या रस्त्यावर मागील काळात या खड्यानमुळे अपघातात महीला मरण पावली तसेच समय ठाकरे याचा अपघात होऊन ते रूग्णालयात उपचार घेत आहे. यामुळे शिवसेनेचे शिवसैनिक विनोद पाडर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ता दुरूस्ती बाबत निवेदन दिले. मात्र दखल न घेतल्याने आज खड्यानमधुन शिवसैनिकांनी लोटांगण घालून आंदोलन केले.

बोदवड ते साळशिंगी व भानखेडा दरम्यान काही रस्ताचे काम झाले. तर काही ठिकाणी रस्त्याचे कामच झाले नाही. या रस्त्यासाठी 1 कोटी 80 लाख रुपये निधी सप्टेंबर 2019 पासुन मंजुर असुन सदर ठेकेदार कामच करत नसल्याने काम अपुर्ण आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागा कडुन सदर ठेकेदारास वेळोवेळी नोटीस बजावली होती तसेच पंधरा दिवसात ठेकादाराने काम न सुरू केल्यास कारवाई करण्याचे पत्र बांधकाम विभागाने दिले होते.

तरी काम सुरू झाले नाही

ठेकादाराने तरी रस्त्याचे काम सुरू न केल्याने आज शिवसैनिकांनी या रस्त्यावर लोटांगन घालत आंदोलन केले. तसेच तरी दखल न घेतल्यात आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी दिला. 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT