जळगाव

येवतीच्या लोकनियुक्त सरपंचांविरोधात अविश्वासचा ठराव

सचिन महाजन

जामठी(ता.बोदवड) ः  येथून जवळच असलेल्या येवती गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच संजय बाळकृष्ण पाटील यांच्यावर गेल्या आठवड्यात अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी येथील ग्रामपंचायत विरोधी सदस्यांनी बोदवडचे तहसीलदार हेमंत पाटील यांना अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता.त्यावर तहसीलदार हेमंत पाटील यांनी आज ग्रामपंचायत येवती येथे विशेष सभा घेण्यात आली. 

आज येवती ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार श्री हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अविश्वास ठरावावर मतदान घेण्यासाठी सभा घेण्यात आली.यामध्ये येवती येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच संजय पाटील यांच्या वरील अविश्वास ठराव दहा विरुद्ध शुन्य,तसेच एक सदस्य गैरहजर , सरपंच संजय पाटील तटस्थ अश्या मतांनी मंजूर करण्यात आला.यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य शांताराम वाघ,नारायण घ्यार,उपसरपंच यशोदाबाई जंजाळ,केशर बाई भिल,मनिषा निळे,ममता मुळे,गोपाळ माळी,अंजनाबाई सुकाळे,उषा सावरीपगार,छाया विसाळे हे उपस्थित सदस्य होते तसेच मांगो शेजोळे हे अनुपस्थित होते.सरपंच पाटील यांच्याविरोधातील अविश्वास ठराव पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला जाणार असल्याची माहिती तहसीलदार हेमंत पाटील यांनी दिली.

इन कॅमेरा झाली सभा

येवती ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या लोकनियुक्त सरपंच पाटील यांच्या विरोधात अविश्वास दाखल करण्यासाठी विरोधी सदस्यांचे बोटे वर करून मतदान घेण्यात आले असून सर्व इन कॅमेरा चित्रीकरण करून घेण्यात आले. 

" येवती येथील काही ग्रामपंचायत सदस्य विकास कामात अडथडे आणत असुन वारंवार पैशांची मागणी करीत होते. त्यामुळेच कटकारस्थान रचले गेले"

- संजय पाटील ,लोकनियुक्त सरपंच येवती
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT