cotton farm 
जळगाव

वेचणीसाठी मजूर मिळेना; कापूस शेतातच! 

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव (जळगाव) : राज्यभरासह चाळीसगाव तालुक्यात यंदा समाधानकारक पावसामुळे कापसाचे पीक काहींना चांगले आले आहे. मात्र, पिकांच्या काढणीला उशीर झाल्याने ग्रामीण भागात सध्या मजूर टंचाई जाणवत आहे. त्यामुळे अनेकांचा पहिल्‍या वेचणीचा कापूस अद्याप मजुरांअभावी शेतातच असल्‍याचे चित्र आहे. सध्या येथे सात रूपये प्रतिकिलोप्रमाणे मजुरी देवूनही वेचणीसाठी मजूर शोधण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 
चाळीसगाव तालुक्‍यात खरीप हंगामात कापूस, मका, ज्‍वारी, बाजरी यासह अन्‍य पिकांची जवळपास ८५ हजार हेक्‍टरवर पेरणी करण्‍यात आली होती. पावसाळ्याच्‍या सुरवातीला पावसाने काहीअंशी उसंत घेतली. परंतु नंतरच्‍या पावसामुळे मुबलक पाणी मिळाल्‍याने पिके जोमात येऊन मालही चांगला आला. परंतु गेल्‍या दोन महिन्यांपूर्वी झालेल्‍या अवकाळी पावसामुळे मका व कापसाचे मोठे नुकसान झाल्‍याने शेतकरी पुन्‍हा आर्थिक अडचणीत सापडला. परंतु पावसाचे प्रमाण चांगले असल्‍याने काही शेतकऱ्यांनी खत व कीटनाशकांचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे पीक जोमात आले. परंतु आलेला कापूस घरापर्यंत आणायला मात्र, मजूर मिळत नसल्‍याने अनेक शेतकऱ्यांच्‍या पहिल्‍या वेचणीचा कापूस अद्यापही शेतातच दिसत आहे. ग्रामीण भागात कापूस वेचणीसाठी तब्‍बल ६ ते ७ रूपये प्रतिकिलोप्रमाणे कापूस मजुरांना पैसे दिले जात आहेत. 

अवकाळीची भीती 
चाळीसगाव तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता अवकाळी पावसाची भीती निर्माण झाली आहे. शेतामध्ये कापूस जोरदार आला आला असून, पावसाचे आगमन झाले तर शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे. 

..अशी आहे आकडीवरी 
- तालुक्यात पेरणी योग्य क्षेत्र : ८५ हजार हेक्टर 
- तालुक्यातील कापसाची लागवड : ५५ हजार हेक्टर 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : सावधान! पीडित महिलांचे AI व्हिडिओ व्हायरल कराल तर जेलमध्ये जाल; नाशिक एसआयटी चा इशारा

Latur News: ‘भाकरीच्या चंद्राला’आता महागाईचा डाग; ज्वारी ५५ ते ६० रुपये किलो, उत्पादन क्षेत्र घटल्याने हुरडा पार्ट्यांवरही परिणाम

Latest Marathi News Live Update : कोकणवासियांसाठी मनसे मैदानात

Uddhav Thackeray: ‘ऑपरेशन टायगर’ची भीती? उद्धव ठाकरेंची खासदारांसोबत तातडीची बैठक; पक्षातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

Aadhaar App Preload : "ही जबरदस्ती कशासाठी?" नवीन मोबाईलमध्ये आधार ॲप सक्तीचे; पण ॲपल-सॅमसंगचा सरकारला विरोध का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT