

Rajul Patil Dismisses Defection Talk, Backs Uddhav Camp
Esakal
शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय हालाचालींना वेग आला आहे. ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदे गटात जाणार आहेत. या खासदारांच्या मतदारसंघात आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दौरा करणार आहेत. दरम्यान, ईशान्य मुंबईतील खासदार संजय दिना पाटील यांची मुलगी नगरसेवक राजुल पाटील यांनी मी उद्धव ठाकरेंसोबतच आहे. पक्षासाठी निष्ठेने काम करणार असल्याचं स्पष्ट केलंय. वडिलांच्या भुमिकेबाबत विचारलं असता तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे असंही सांगितलं.