जळगाव

मुलाचा अंत्यविधी झाला नाही तोच बापानेही सोडला प्राण !

दिपक कच्छाव

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : एकीकडे अल्प आजारामुळे तरुण मुलाचा झालेल्या मृत्युचे दु:ख प्रचंड असतांना हे दु:ख सहन न झाल्याने मुलाचा अंत्यविधी करुन घरी आले तेच पंधरा मिनिटात बापानेही प्राण सोडला. ही मनाला चटका लावणारी घटना वरखेडे (ता.चाळीसगाव)येथे आज घडली.

वरखेडे (ता.चाळीसगाव)येथील शेतकरी रामसिंग मालसिंग कच्छवा (वय ९०) यांचा मुलगा प्रेमसिंग रामसिंग कच्छवा(वय ५९) हे काही दिवसापासून आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरुच होते.काल (ता.२८)रोजी  त्यांची प्रकृती बिघडली.गुरुवारी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास त्यांचे निधन झाले.आज दुपारी वरखेडे येथे त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.या वयोवृद्ध बापाने डोळ्यासमोर आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याच्या प्रंचड वेदना झाल्या.त्यांना मुलाच्या मृत्युचे दु:ख वयोवृद्ध वडिल रामसिंग कच्छवा यांना होते. मुलाचे पार्थिव घरातून निघाले तेव्हा त्यांनी मुलाला उशी दिली. 

वडीलांनी सोडला प्राण 

प्रेमसिंग कच्छवा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू आसताना वडील खुर्चीवर बसलेले होते.प्रेमसिंग यांना शेवटचा निरोप देऊन नातेवाईक व कुटंबातील सदस्य घरी आले.मुलाचा मृत्यू हा वयोवृद्ध वडीलांना सहन झाले नाही.पंधरा मिनिटात तोच रामसिंग बाबा मुलाच्या मृत्युच्या धसक्याने गतप्राण झाले.मुलगा प्रेमसिंग यांच्या  बाजुलाच  बापावरही अंत्यसंस्कार करण्यात आले.या वयोवृद्ध बापाला मुलाचा मृत्यु सहन न झाल्याने प्राणत्याग केला. या घटनेने वरखेडेकर सुन्न झाले आहेत.
 

जळगाव

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CIDCO: सिडको थकबाकीदार! नवी मुंबई पालिकेकडून मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू

Shiroli MIDC : शिरोली एमआयडीसीत ऑईल दुकानाला भीषण आग; अग्निशमन दलाची धावपळ

Numerology : 'या' 2 मूलांकाच्या लोकांना कधीच सांगू नका तुमचे सिक्रेट; सरड्यासारखे रंग बदलून जगापुढे करतात तुमची नाचक्की

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या आदिवासी आयुक्तालय बाहेर आदिवासी विद्यार्थ्याचा ठिय्या

Kolhapur City Boundary Expansion : कोल्हापूर शहराची हद्दवाढ २०२७ पर्यंत होणार नाही, खरं कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT