जळगाव

चार दशकांपासून नदीपात्रातून प्रवास, पुलाअभावी जीव धोक्यात 

गणेश पाटील

चाळीसगाव ः चार दशकांपासून वसाहत असलेल्या आणि सुमारे ३० ते ३५ हजार लोकवस्ती असलेल्या जहागीरदारवाडीतील रहिवाशांना पावसाळ्यात तितूर-डोंगरी नदीपात्रातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. हा पूल अद्यापही प्रलंबित असून, नदीला पूर आल्यास या भागातील नागरिकांचा शहराशी संपर्क तुटतो. त्यामुळे प्रशासन एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट तर पाहात नाही ना, असा संतप्त सवाल येथील नागरिकांकडून विचारला जात आहे. 

चाळीसगाव शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. जुन्या गावात जागा कमी पडत असल्याने डोंगरी नदीपात्राच्या पलीकडे नवीन वसाहती वसू लागल्या आहेत. परंतु तितूर व डोंगरी नदीपलीकडे असलेल्या वसाहतीला जोडण्यासाठी आजही तब्बल चार पुलांचे काम प्रलंबित आहे. पावसाळ्यात नदीला थोडे जरी पाणी आले तरी या ठिकाणी गाव व या वसाहतींचा संपर्क तुटतो. या नदीवर छोटे पूल नसल्याने पावसाळ्यात नागरिकांना नदीच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतो. याबाबत येथील नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी व सूचना केल्या आहेत. तरीदेखील ही बाब दुर्लक्षित राहत असून, आता या नदीवर छोटे पूल तयार करण्याची मागणी या वसाहतीतील नागरिक करीत आहेत. डोंगरी व तितूर नदीपात्रावर तब्बल पाच ठिकाणी चाळीसगाव शहरात पूल नसल्याने नागरिकांना थेट नदीपात्रातून जीवघेणा प्रवास करावा लागत असून, या ठिकाणी तत्काळ पूल करण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत. 

...या ठिकाणी हवे पूल 
चाळीसगाव शहराच्या जुन्या गावाकडून तितूर व डोंगरी नदीपलीकडे असलेल्या वसाहतीला जोडण्यासाठी चार पुलांची आवश्यकता आहे. या ठिकाणी तब्बल २० ते २५ वर्षांपूर्वी छोटे पूल बांधण्यात आले होते. परंतु नदीपात्रात घाणीचे साम्राज्य पसरले असून, पात्र उथळ झाले आहे. यामुळे बामोशीबाबा दर्गामागील पूल, मराठा मंगल कार्यालयाजवळील पूल, काडी कारखान्याजवळील पूल व कोदगाव रोडवरील पूल या चार पुलांचा समावेश आहे. दत्तवाडीसह अन्य ठिकाणी असे दोन पूल करण्यात आले आहेत. परंतु या पुलांची उंचीदेखील कमी असल्याने हे पाणी थेट पुलावर येत असून, पुलाखालील भराव वाहून जातो. 


लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा; प्रशासनाची डोळेझाक 
चाळीसगाव शहरातील पाच ठिकाणी तत्काळ पूल करण्यात यावे, यासाठी नगरसेवक, नगराध्यक्ष यांसह अन्य लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. नागरिकांची समस्या तत्काळ सोडवून पूल तयार करावा, अशी मागणी लोकप्रतिनिधी वारंवार करत असतानादेखील प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे. 
 

संपादन-भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganpati Visarjan : अखेर विसर्जन मिरवणुकीचा वाद मिटला; सकाळी साडेनऊ वाजता सुरू होणार मिरवणूक

Online Gaming Bill News : मोठी बातमी! राष्ट्रपती मुर्मू यांनी ‘ऑनलाइन गेमिंग’ विधेयकाला दिली मंजुरी

Maharashtra Latest News Live Update : मांजरी खुर्दमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा दहा जणांना चावा

बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा वारसा चालवत असल्याच्या टिमक्या...; आनंद परांजपे यांची शिवसेनेवर जहरी टीका, काय म्हणाले?

"माझा घटस्फोट झालेला नाही" मराठी अभिनेत्रीने चर्चांवर मौन सोडत केली ट्रोलर्सची बोलती बंद; म्हणाली..

SCROLL FOR NEXT