girish mahajan 
जळगाव

मी राजकारणातला कुस्तीपटू; बाहेर काढण्यात, ओढण्यात पारंगत; गिरीश महाजनांची टोलेबाजी 

गणेश पाटील

चाळीसगाव (जळगाव) : कुस्ती हा विषय मला नवीन नाही. मी कुस्तीसह कबड्डी व खो-खोचा उत्कृष्ट खेळाडू आहे. कोणाला बाहेर काढायचे व कोणाला ओढायचे यात मी पारंगत असल्याने मी राजकारणातला कुस्तीपटू आहे; असा खोचक टोला माजी जलसंपदा मंत्री तथा आमदार गिरीष महाजन यांनी लगावला.  
घाटरोडस्थित नगरसेवक अण्णा कोळी पहेलवान व्यायाम शाळेच्या भूमीपूजनाच्या प्रसंगी बोलत होते. यावेळी खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, शिवसेनेचे उपनेते तथा जिल्हाप्रमुख उमेश गुंजाळ, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष शिवाजी राजपूत, उद्योजक योगेश अग्रवाल, आमदार रमेश पाटील, माजी आमदार साहेबराव घोडे, राष्ट्रीय विद्यालयाचे संचालक विश्वास चव्हाण, सदानंद चौधरी, पत्रकार किसनराव जोर्वेकर, कुस्ती मल्ल विद्या संघटनेच्या महिला अध्यक्षा चित्रा मोरे, सिद्धांत कोळी, सौरभ कोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

खरा पुरूषार्थ व्यायामात दाखवा
सर्वांत जास्त युवाशक्ती भारतात आहे; परंतु युवाशक्ती ही व्यसनाधिनतेकडे वळाली असून, ते वाया गेले आहेत. परंतु, आजच्या तरुणांनी खरा पुरूषार्थ हा व्यसनाधिनतेपेक्षाही व्यायामात दाखवावा, असे आवाहन आमदार महाजन यांनी केले. कुस्तीपटूंसाठी पेन्शन व नोकरीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. साधुसंतांबरोबरच चाळीसगाव तालुक्याची भूमी ही पहेलवानांची भूमी म्हणून ओळखली जाते. व्यायामशाळा चालू करण्यामागे माझे हेच उद्दिष्ट असून, तरुणांना अवैध मार्गाकडे न वळता त्यांना कुस्तीत पारंगत करण्यासाठी ही व्यायामशाळा उघडत असल्याचे मत नगरसेवक अण्णा कोळी यांनी केले. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनाेज जरांगेंचा मोठा निर्णय? १८व्या दिवशी मुंबईकडे निघण्याची तयारी; उपोषणस्थळी समर्थकांची गर्दी

Saundatti Dharwad Road Accident : बेळगावसाठी काळा दिवस! १५ तासांत ७ जणांचा मृत्यू; सौदत्ती-धारवाड मार्गावर भीषण अपघातात तीन मित्र जागीच ठार

Mumbai-Goa Highway Chemical Leak : मुंबई-गोवा महामार्गावर पुगाव हद्दीत ज्वलनशील रसायन वाहून नेणाऱ्या कंटेनरला अपघात; सर्व यंत्रणांच्या सतर्कतेमुळे गणेशोत्सवातील भीषण दुर्घटना टळली

Latest Marathi News Update : मनोज जरांगे पाटील ११ वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

टीम इंडियाने करंडक जिंकला, नक्वींच्या हातून ट्रॉफीही घेतली नाही; आता ACC अध्यक्षांच्या खुर्चीवर टांगती तलवार, पुन्हा निवड होणार का?

SCROLL FOR NEXT