kannad ghat  
जळगाव

जळगाव :कन्नड घाटात आठ ठिकाणी दरड दुर्घटना;ट्रक दरीत पडून एक ठार

गत आठवड्यातही सततच्या पावसामुळे दरड कोसळून घाटातील वाहतुक जाम झाली होती.

दीपक कच्छवा

दरम्यान कन्नड घाटात बचाव कार्य करणाऱ्या राज्य आपत्ती व्यवस्थापन टीम दाखल झाली असून ही टीम घाटातील दरड दुर करण्याचे काम करीत आहे.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : गेल्या काही दिवसापासून जाम होणाऱ्या कन्नड घाटात (Kannada Ghat) आज पहाटे अतिवृष्ठीमुुळे (Heavy Rain)तब्बल सात ते आठ ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. प्रचंड पडणारा पाऊस आणि कोसळणाऱ्या दरडी(landslide) यामुळे घाटात अनेक वाहने अडकली. त्यामुळे घाटातील दोन्ही बाजुंनी वाहतुक बंद करण्यात आली असून घाटातील दरड काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

kannad ghat

दरम्यान घाटात दरड कोसळल्याची माहीती मिळताच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ प्रविण मुंढे, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे यांच्यासह आमदार मंगेश चव्हाण यांनी घाटाची पाहणी केली. दरड कोसळल्याने घाटातील वाहतुक बंद असून किमान तीन ते चार दिवस ही दरड दूरू करून घाटातील वाहतुक पूर्ववत करण्यासाठी लागतील असे महामार्ग पोलीसांचे म्हणणे आहे. गत आठवड्यातही सततच्या पावसामुळे दरड कोसळून घाटातील वाहतुक जाम झाली होती. आता पुन्हा दरडी कोसळल्याने वाहतुक जाम झाली असून वाहनधारकांना पर्यायी मार्गाने वाहतुक नेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Truck fell into valley


ट्रक दरीत कोसळला- एक ठार तर एक जखमी
दरम्यान कन्नड घाटात एकाच रात्री तब्बल सात ते आठ दरडी कोसळत असताना त्याचवेळी एक ट्रक चालक घाटातून जात असताना ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक खोल दरीत कोसळल्याची माहिती असून या अपघातात एक जण ठार झाला असून दुसरा जबर जखमी असल्याचे कळते सकाळी पाऊस सुरू असल्याने मदत कार्यात अडचणी येत होत्या त्यामुळे दुपारपर्यंत मृत व जखमी व्यक्तींचे नाव कळू शकले नव्हते.

kannad ghat

बचाव कार्य पथक दाखल
दरम्यान कन्नड घाटात बचाव कार्य करणाऱ्या राज्य आपत्ती व्यवस्थापन टीम दाखल झाली असून ही टीम घाटातील दरड दुर करण्याचे काम करीत आहे. या बचाव पथकाला आमदार मंगेश चव्हाण यांच्यामार्फत जेवणाचे पाकीटे व पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स उपलब्ध करून देण्यात आले. भाजपाचे पदाधिकारी भास्कर पाटील, योेगेश खंडेलवाल, मनोज गोसावी, जगदीश महाजन यांनी ही मदत घाटात जावून पोहच केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT