Theft  
जळगाव

गिरणा पट्यात दहशत बिबट्याची..मात्र डाव साधताय चोरटे

बिबट्याच्या भीतीने ते शेतात गेले नाही आणि तीच संधी चोरट्यांनी साधली. भरधाव वाहनातून आलेले चोरटे पहाटेच्या वेळी डाव साधतात.

दीपक कच्छवा

मेहुणबारे (ता.चाळीसगाव): गिरणा पट्ट्यात बिबट्याची (Leopards) दहशत असतांना चोरट्यांनी घातलेल्या धुमाकूळमुळे या परिसरात शेतकरी (Farmers) अक्षरशा हतबल झाले आहेत. एका पाठोपाठ एक गुरे चोरीच्या (Theft) घटना घडत असून या वाढत्या घटनांमुळे शेतकऱ्यांरी मेटाकुटीला आले आहेत.वरखेडे (ता.चाळीसगाव) येथे एक बैल व दोन गायी चोरीला गेल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे.

वरखेडे(ता.चाळीसगाव) शिवारात अनेक दिवसापासून बिबट्याची दहशत आहे.रात्री अपरात्री केव्हाही नागरीकांना बिबट्याचे ओझरते दर्शन होते मध्यंतरी बिबट्याने हिंस्त्र प्राण्यांसह वासरे, बकऱ्यांवर फडशा पाडला होता. परिसरात बिबट्याचा लपंडाव सुरू असल्याने भयभीत झालेले नागरीक रात्री शेतात गुरांची राखण करण्यास धजावत नाहीत. परिणामी याचा फायदा गुरेचोरांनी घेतला आहे. गेल्या चार सहा महिन्यात वरखेडे भागात गुरे चोरीच्या काही घटना घडल्या आहेत. वरखेडे येथील जयसिंग कच्छवा यांचे एक बैल व दोन गायी चोरीस गेले श्री कच्छवा हे रात्री नेहमी गुरांजवळ झोपत होते. बिबट्याच्या भीतीने ते शेतात गेले नाही आणि तीच संधी चोरट्यांनी साधली. भरधाव वाहनातून आलेले चोरटे पहाटेच्या वेळी डाव साधतात व रस्त्यांच्या बाजुला असलेल्या शेतांमधील दावणीला बांधलेले गुरे चोरून नेत त्याच रस्त्याने भरधाव धूम ठोकतात.

शेतकरी हतबल ...

गुरे चोरीच्या या वाढत्या घटनांमुळे शेतकरी हतबल झाले आहेत.आधीच कोरोनाचा मार त्यात सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत असतांना बहुमोल किंमतीचे गुरे चोरीस जात असल्याच्या प्रकारानेे शेतकरी धास्तवाले असुन मेहुणबारे पोलिसांच्या रडारवर ही गुरे चोरणारी टोळी असुन त्यादृष्टीने रात्रीची गस्त देखील वाढविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

चोरीचे प्रयत्न फसले

यापूर्वीही या भागात चोरट्यांनी गुरे चोरीचे प्रयत्न केले आठ दिवसापूर्वी तिरपोळे रस्त्यावर चोरट्यांनी दावणीला बांधलेले जनावरांचे दोर कापण्याचा प्रयत्न करीत असतांना तेथे झोपलेल्या लोकांना जाग आली व त्यांनी आरडाओरड केल्याने चोरटे पळून गेले. तर 15 दिवसापूर्वीही धामणगाव रस्त्यावर असाच प्रकार घडला होता. म्हशींच्या गोठ्यावर रात्रीच्या सुमारास चोरटे आले पण चोरटे आल्याची चाहूल लागल्यावर तेथील मजुरांनी आरडाओरड केल्याने चोरटे पळून गेले.या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Dhabi Visa: भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर! अबू धाबीचा UAE व्हिसा मोफत मिळणार, अटी काय अन् कुणाला फायदा होणार?

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी ४१३ किमीचे नवीन रस्ते; ६२७ कोटींचा खर्च

Nutritious Diet : पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांची ताटे रिकामीच! कुठे तेल आहे तर तांदूळ नाही, हळद आहे तर जिरे-मोहरी नाही

SCROLL FOR NEXT