yoga yoga
जळगाव

४४ वर्षांपासून विनामूल्य सेवा; ८७ व्‍या वर्षीही योगसाधकांचे उत्‍तम गुरू

सकाळ डिजिटल टीम

चाळीसगाव (जळगाव) : येथील योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे हे (Yogacharya vasantrao chandratre) तब्बल ४४ वर्षांपासून अखंडपणे नागरिकांना योगाचे धडे देत असून, वयाच्या ८७ व्या वर्षांतही त्यांचे योगासंदर्भातील (Yoga training) दिले जाणारे मार्गदर्शन साधकांना प्रेरणादायी ठरत आहे. सध्याच्या कोरोना काळातील लॉकडाउनचे (Lockdown) काही दिवस वगळता हा वर्ग एकही दिवस त्यांनी बंद ठेवलेला नाही. आरोग्यप्राप्तीसह व्याधी निवारणासाठी अनेकांना या योगसाधना वर्गाचा मोठा लाभ झाला आहे. (chalisgaon-old-man-vasantrao-chandratre-free-yoga-training)

योगसाधनेमुळे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक आरोग्य प्राप्त होऊन जीवन आनंददायी होत असल्याची अनुभूती अनेकांना आली आहे. सुमारे पाच हजार वर्षांची परंपरा लाभलेल्या योगसाधनेतून मानसिक शांती लाभत असून, उत्साही दिनचर्येसाठी योगसाधना महत्त्वपूर्ण ठरली आहे. अशा योगाचे नागरिकांना धडे देणाऱ्या योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे यांनी १९७५ च्या आणीबाणीतील कारावासानंतर १९७७ मधील हनुमान जयंतीला हा योग वर्ग सुरू केला होता. या वर्गातून समाजातील सर्व घटकांतील स्त्री पुरुषांना त्यांचे आजही अखंडितपणे मार्गदर्शन सुरू आहे. सध्याच्या कोरोना काळातही या वर्गात लॉकडाउनसंदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात असून, सद्यःस्थितीत ४० ते ४५ साधक या वर्गाचा लाभ घेत आहेत.

योगभवन साकारणार

शहरात योगभवन साकारण्याचे श्री. चंद्रात्रे यांचे स्वप्न असून, ते आता लोकसहभागातून लवकरच साकारले जाणार आहे. प्रथम स्वतःचे योगदान देऊन त्यांनी योगभवनासाठी समर्पणाचे आवाहन केले. आमदार मंगेश चव्हाण यांचे त्यांना मोलाचे सहकार्य लाभले. मात्र, ज्या लोकप्रतिनिधींनी योगभवनासाठी आर्थिक सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे, ते त्यांनी पाळले नसल्याची खंत श्री. चंद्रात्रे व्यक्त करतात. असे असले तरी सहकारी विश्‍वस्तांच्या योगदानातून तसेच लोकसहभागातून योगभवनाचे बांधकाम लवकरच पूर्णत्वास येईल, असा विश्‍वास वसंतराव चंद्रात्रे यांना आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT