Yaksha 
जळगाव

पाटणादेवी पितळखोरे लेणीतील यक्ष दिल्लीच्या संग्रहालयात

Chalisgaon Patna Devi News: शतकोत्तर वर्षानिमित्त पितळखोरा लेणीत जगात एकमेव सुस्थितीत असलेला यक्ष याचे पंधरा पैशांचे टपाल तिकीट प्रकाशित केले होते.

आनंन शिंपी

गणितसूर्य भास्कराचार्य यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या शहरापासून अठरा किलोमीटवरील पाटणादेवीच्या परिसरात पितळखोरा लेणी आहे.


चाळीसगाव ः पाटणादेवी (ता. चाळीसगाव) (Patna Devi )परिसरातील पितळखोरे लेणीतील (Pitalkhore caves) सुस्थितीत असलेला यक्षाचे टपाल तिकीट (Postage stamp) काढून लेणीला सन्मान प्राप्त झालेला असताना हा यक्ष आता भारतीय पुरातत्व विभागाने (Archaeological Survey of India) आपल्या दिल्लीतील नॅशनल म्युझियममध्ये (National Museum in Delhi) नेला आहे. त्यावर हा यक्ष पितळखोरा लेणीतील असल्याचा उल्लेख केलेला असल्याने चाळीसगावच्या लौकीकात पुन्हा एकदा भर पडली आहे.


गणितसूर्य भास्कराचार्य (Ganitsurya Bhaskaracharya) यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या शहरापासून अठरा किलोमीटवरील पाटणादेवीच्या परिसरात पितळखोरा लेणी आहे. ही लेणी पुरातन असून आजही या ठिकाणी दगडांवरील कोरीव काम व चित्रांचे रंगकाम शाबूत आहे. भारतीय डाक विभागाने १९६१ मध्ये भारतीय पुरातत्व विभागाच्या शतकोत्तर वर्षानिमित्त पितळखोरा लेणीत जगात एकमेव सुस्थितीत असलेला यक्ष याचे पंधरा पैशांचे टपाल तिकीट प्रकाशित केले होते. पितळखोरा लेणी ही भारतातील सर्वांत जुन्या लेण्यापैकी एक असून ती अंदाजे २ हजार ३०० वर्षांपूर्वी कोरण्यात आल्याची नोंद आढळते. ही लेणी अजिंठा लेण्यापेक्षाही जवळपास १०० वर्षे आधी कोरली आहे. टपाल तिकिटावर प्रसिद्ध करण्यात आलेला यक्ष पुरातत्व विभागाच्या दिल्लीतील नॅशनल म्युझियममध्ये असून त्यावर हा यक्ष पितळखोरा लेणीतील असल्याचा उल्लेख लिहिला असल्याचे येथील कलामहर्षी केकी मूस प्रतिष्ठानचे सचिव कमलाकर सामंत यांनी सांगितले.



हेमांडपंथी मंदिरांच्या खांबावरही यक्ष
जंगलात प्रवेश केल्यानंतर पाटणादेवीच्या मंदिराकडे जाताना डाव्या हाताला पुरातन हेमांडपंथी शिवमंदिर आहे. पहाटे सुर्योदय झाल्यानंतर सूर्यांची पहिले किरणे मंदिरातील महादेवाच्या पिंडीवर पडतात. या मंदिरातील खांबांवरही चार यक्ष कोरले आहेत. या भागातील चांदणीकृत बांधणीतील हे एकमेव मंदिर आहे. त्यात सभामंडप, गाभा व शिवलिंग असलेले गर्भगृह असे तीन टप्पे असून ठिकाणी महादेवाची पिंड आहे, त्या गर्भगृहात ‘सप्त मातृका’ (सात देवी) कोरलेल्या आहेत. मंदिराची आतील रचना करताना दोन्ही ठिकाणी कमळ असून मंदिराचा भार चार यक्षांनी आपल्या खांद्यांवर पेलला आहे. पितळखोरातील यक्ष दिल्लीतील संग्रहालयात असला तरी हेमांडपंथी महादेवाच्या मंदिरातील यक्ष आजही या ठिकाणी सुस्थितीत आहेत, अशी माहिती या भागाचा गाढा अभ्यास असलेले मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांनी ‘सकाळ’ला दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanpur Mishri Bazaar blast : कानपूरच्या मिश्री बाजारात मशिदीजवळ भीषण धमाका; दोन स्कुटरमध्ये झालेल्या स्फोटात सहा जण गंभीर जखमी

Dilip Khedkar यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला! अपहरण, मारहाण आणि पुरावे नष्ट करण्याचे गंभीर आरोप

Professor Recruitment Issue : प्राध्यापक भरतीत राज्यातील उमेदवारांसोबत दुजाभाव; भरती प्रक्रियेतील शैक्षणिक अर्हतेसाठी दिले कमी गुण

Pune: पुणे पोलिसांना लायटर आणि पिस्तूलमधील फरक कळेना? हडपसर पोलिसांकडून कोथरूड पोलिसांचा ‘खोटारडेपणा’ उघड

Mumbai: पात्र झोपडीधारकांऐवजी मृतांना घरे वाटली; झोपु योजनेतील बेदायदेशीर सदनिका वाटपाची चौकशी करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

SCROLL FOR NEXT