accident 
जळगाव

घर अवघे दोन किमीवर त्‍यापुर्वीच तो पडला अन्‌

बापू शिंदे

तरवाडे (ता.चाळीसगाव) : खराब रस्‍त्‍यांचे दुरूस्‍तीचे काम सुरू आहे. या कामादरम्‍यान अनेक ठिकाणी रस्‍ते खोदण्यात आले आहेत. पण रस्‍त्‍याचे हे काम देखील वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहे. संबंधीत ठेकेदाराने रस्‍ता खोदलेल्‍या ठिकाणी दिशादर्शक फलक लावला नसल्‍याने मोटारसायकलस्‍वार खड्ड्यात पडला आणि त्‍या जीव गेल्‍याची घटना बिलाखेड (ता.चाळीसगाव) येथे घडली.

बिलाखेड येथील रहिवासी रविंद्र नथ्थू दरेकर हा (वय ३५) तरुण पाचोरा येथील खासगी कंपनीत नोकरीला होता. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा येथे एकटाच राहता होता. पत्त्नी, दोन मुली आणि एकुलता एक मुलगा बिलाखेड गावी शेतातील आपल्या राहत्या घरी आई व दोन मोठ्या भावांजवळ राहत होते. आठवड्यात एक दिवस रविंद्र घरी येत होता. 

अवघे दोन किमी घर आणि...
सोमवारी (ता.७) रात्री साडेनऊच्या सुमारास घरापासून अवघ्या दोन किमी अंतरावर त्याच्यावर काळाने झडप घातली. चाळीसगाव ते बिलाखेड दरम्यान रस्त्याचे काम सुरु असलेल्या ठिकाणी पुलाचे जागी रस्ता खोदलेला होता. त्या जागी पाईपही टाकलेले होते; मात्र बाजूने पर्यायी रस्ता तयार केलेला असला तरी दिशा दाखविणारा कोणताही फलक लावला नसल्याने या मोटारसायकलस्वारास अंदाज न आल्याने मोटारसायकलसह खड्ड्यात पडला. यावेळी तो सिमेंट पाईपावर आदळल्‍याने डोक्याला गंभीर मार लागल्याने त्‍याचा जागीच मृत्यू झाला. 

चिमुरड्यांचे पितृछत्र हरपले
घरापासून अवघ्या दोन किमी अंतरावर त्यांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा फसरली तिन वर्षाचा कैवल्य व अनुक्रमे सात व पाच वर्षाच्या दोन मुलींचे पितृछत्र गेल्याने हळहळ व्यक्त होत होती. पुलाचे काम सुरु असताना बाजूने पर्यायी रस्ताही होता; मात्र मुख्य रस्त्यावर रेडियम लावलेला फलकच नव्हता. तर मातीचा मोठा ढिग सुध्दा नसल्याने रविंद्र सरळ मोटारसायकल घेऊन पडल्यानेच अपघात झाला. अपघाताची माहिती ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना मिळाल्यावर दिवस उजेडायच्या आत फलक लावण्यात आल्‍याचे बोलले जात आहे.

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फसव्या जाहिराती, निकृष्ट दर्जा! सौंदर्यप्रसाधनांवर FDAची कारवाई; गैरप्रकार सहन केला जाणार नाही, तुकाराम मुंढेंचा इशारा

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गकरांनो, आणखी वाट पाहावी लागणार! मॉन्सून पूर्णपणे मंदावला; पाहा पुढील 4 दिवसांचा अंदाज, शेतीची कामे रखडली

Fifa World Cup 2026 : जपानी फॅन्स मॅचनंतर स्टेडियममधील कचरा का उचलतात? त्या तरूणीनं 'Meiwaku' बद्दल सांगितलं, जाणून घ्या काय आहे ते?

Nagpur: पाण्याचे शिंतोडे उडाल्याच्या वादातून खून;कळमन्यातील घटना; दोन कुटुंबातील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Satara Sangli Election: सातारा-सांगली निवडणुकीत मोठा सस्पेन्स! राष्ट्रवादीची नाराजी उघड, भाजपला मित्रपक्षांची साथ मिळणार का?

SCROLL FOR NEXT