जळगाव

वरखेड्यात बिबट्याचे हल्ले सुरुच..शेतातून बकरी पळवली

दिपक कच्छवा

मेहुणबारे (ता.चाळीसगाव): वरखेडे (ता.चाळीसगाव)येथील शिवारात बिबट्याचे (Leopard) हल्ले सुरूच आहेत. दर दोन दिवसाआड बिबट्याकडून हाल्ले होत आहे. वरखेडे शिवारातील चौकीबर्डी भागातील शेतात (Farmer) बांधलेल्या बकरीला बिबट्याने रात्री पळवली ती आज दुसऱ्या शेतकऱ्याच्या उसाच्या शेतात (Sugarcane Farm) मृत (Death)अवस्थेत सापडली.या बिबटयाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.(varkede viilege again leopard attack got kill)

वरखेडे शिवारात गेल्या चार वर्षापूर्वी नरभक्षक बिबट्याने घातलेल्या थैमानाची घटना अद्यापही या भागातील नागरीकांच्या डोळ्यासमोरून गेली नसतांना गेल्या 15 दिवसापासून बिबट्याने थैमान घातले आहे. वरखेडे शिवारात बिबट्याचा पुन्हा हैदोस सुरू झाला आहे.गत सोमवारी बिबट्याने वासरूचे धडावेगळे शिर वेगळे केल्याच्या अवस्थेत वासरूचा फडशा पाडल्याचे समोर आले होते आता पुन्हा बिबट्याने वरखेडे पासून चार किमी अंतरावर असलेल्या चौकीबर्डी शिवारात उंबरखेड येथील राजेंद्र धनसिंग पाटील यांचे शेतातील गोठ्यात बांधलेली बकरी (ता.२४) रोजी रात्री बेपत्ता झाली. त्या बकरीचा शोध घेतला पण कुठेही मिळून आली नाही. मात्र आज सकाळी उंबरखेड शिवारातील नदीच्या पलीकडे एकनाथ महाजन यांच्या उसाच्या शेतात ही बकरी मृत अवस्थेत मिळून आली. बिबट्यानेच या बकरीला गिरणापात्रातुन ओढून नेत उंबरखेडे शिवारात फडशा पाडल्याचे प्राथमिक दिसून आले. या घटनेची माहिती वन विभागाला कळताच श्रीराम राजपूत यांनी घटनास्थळी धाव घेऊन लगेच पंचनामा केला.

बिबट्या हिंसक होण्याची शक्यता

या घटनेमुळे बिबट्याचे एक-दोन दिवसाआड पशुधनावर हल्ले सुरूच असल्याचे दिसून येते.गेल्या सोमवारी देखील बिबट्याने वासरूचे शिर धडावेगळे केले होते.बिबट्या ज्या प्रकारे पशुधन फस्त करीत आहे ते पाहता तो हिंसक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बिबट्याचा बंदोबस्त करा

या भागात गेल्या काही दिवसापासून बिबट्याने पशुधन फस्त करण्याचा सपाटा लावला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. खरीप हंगाम सुरू झाल्याने शेतकऱ्यांसह शेतमजुरांची शेतांमध्ये लगबग वाढली आहे. त्यातच वरखेडे भागात बिबट्याचा हैदोस सुरू असल्याने शेतकरी,शेतमजुरांवर बिबट्याकडून हल्ले होण्याची श्नयता नाकारता येत नाही.चार वर्षापूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती टाळायची असेल तर वन विभागाने तातडीने दखल घेऊन या भागात पिंजरा लावावा अशी मागणी माजी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रभाकर जाधव यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT