Drowning death 
जळगाव

चाळीसगाव :पोहायला गेलेल्या दोन भावांचा पाण्यात बुडून मृत्यू

Drowning death :नदीत पोहत असताना त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. यामुळे ते पाण्याच्या प्रवाहात वाहू लागले.

सकाळ वृत्तसेवा

वाघळी(ता.चाळीसगाव) : येथील दोन मुलांचा तितूर नदीपात्रात पोहायला गेले असता खोल पाण्यात बुडून मृत्यू (Drowning death) झाल्याची घटना घडली उशिरापर्यंत मृतदेह सापडत नसल्याने एक मृतदेह काढण्यात पोलीसांना (Police) यश आले तर दुसरा मृतदेह रात्री उशीरापर्यंत शोध सुरु होता.


पोहण्यासाठी गेलेल्या वाघळी येथिल रहिवासी १४ ते १६ वर्षे वयोगटातील दोन सख्खे भाऊ पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडल्याची घटना आज घडली. पोलीस पाटलांनी पोलीस आणि तहसिलदारांना माहिती दिल्यावर तहसीलदार अमोल मोरे घटनास्थळी दाखल झाले. वाघळी गावालगत तितुर नदीपात्रात कमळेश्वर के. टी. वेअरजवळ रविवारी ही घटना घडली.


नदीत बुडून मृत्यू झालेल्यांमध्ये साहिल शहा शरीफ शहा फकीर (वय १४) व आयान शहा शरीफ शहा फकीर (वय १६) अशी या दोन भावांची नावे आहेत. नदीत पोहत असताना त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. यामुळे ते पाण्याच्या प्रवाहात वाहू लागले. यातून त्यांना बाहेर निघता आले नाही. यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी नदीपात्रात जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र एकाचा मृतदेह चाळीसगाव ग्रामिण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉ.बिभिषण सांगळे यांनी आयानचा मृतदेह काढला तर साहिल अद्यापही बेपत्ता असून उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mallikarjun Kharge Warrant : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंच्या अडचणीत वाढ ! कोर्टाने जारी केले वॉरंट; नेमकं काय आहे प्रकरण?

पीएचडी स्कॉलर ज्योतीचा विद्यापीठ कॅम्प्समध्ये शॉक लागून मृत्यू; कुटुंबाला १६ लाखांची नुकसान भरपाई आणि भावाला नोकरीची घोषणा

Live Marathi News Update : पुण्यात पद्मावती शाळेतील उद्वाहकात अडकलेल्या महिलेची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका

World Tiger Day: जिथे पूर्वी होती मानवी वस्ती, तिथे आता वाघांचे राज्य! सातपुडा टायगर रिझर्व्हमध्ये ५५ हून अधिक वाघांचा वावर

Gulabrao Patil : 'एकवेळ शेतकऱ्यांना त्रास झाला तर चालेल, पण उद्योजकांना वीज मिळाली पाहिजे'; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य, शेतकरी वर्गात संताप

SCROLL FOR NEXT