जळगाव

बिबट्याच्या हल्ल्यात घोडा ठार; ग्रामस्थांमध्ये भीती !

दीपक कच्छवा

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : सेवानगर तांडा (ता. चाळीसगाव) परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सेवानगर तांड्यातील साईनाथ गब्बू राठोड यांच्या माळरानावरील शेतातील झाडाला बांधलेल्या घोड्यावर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

सेवानगर तांडा (ता.चाळीसगाव) येथे साईनाथ राठोड याच्या शेतात बिबट्याच्या झालेल्या हल्ल्यात घोडा ठार झाला आहे. शेतात शेतकरी साईनाथ राठोड यांनी गाय, वासरू व दोन घोडे बांधलेले होते. बिबट्याने फक्त घोड्यावर हल्ला चढवला. बिबट्याने मानेजवळ पंजाने ओरबाडले तर मागील पायाजवळील मोठा भाग ओरबाडून काढला. साईनाथ राठोड यांचा मुलगा प्रताप हा आज पहाटे नेहमीप्रमाणे शेतात गेला असता एक घोडा मृत अवस्थेत आढळून आला. हा हल्ला बिबट्यानेच केल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. या घटनेने या माळरानावरील मेंढपाळ व शेतकऱ्यांमध्ये बिबट्याची दहशत पसरली असून, वन विभागाने त्वरित या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. या घटनेच्या संदर्भात वनविभागाचे वनपाल संजय चव्हाण यांना विचारले असता आमच्याकडे याबाबत कुठल्याही प्रकारची माहिती आली नसल्याचे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. या भागात झालेला हाल्ला बिबट्याचा आहे की हिंस्त्र प्राण्याचा याबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 


बिबट्याचे अधुनमधून दर्शन 
सेवानगरपासून काही अंतरावर असलेल्या वरखेडे भागात दोन वर्षांपूर्वी बिबट्याने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. अनेक जनावरांना ठार करण्याबरेबरच सात मानवी बळी नरभक्षक बिबट्याने घेतले होते. गोळी घालून बिबट्याला ठार केल्यानंतरही वरखेडे, दरेगाव भागात बिबट्याचे अधूनमधून दर्शन होतच राहिले.  

 
संपादन- भूषण श्रीखंडे जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Ghee Adulteration : तिरुपती लाडूच्या तुपात पाम तेल आणि रसायनांचा वापर? EDकडून कंपनीच्या प्रवर्तकाला अटक

Farmer Loss Assessment : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; पाच ऑक्टोबरपासून पंचनामे करण्याचे आदेश

तिरुपतीच्या लाडूसाठी ९६ कोटींच्या भेसळयुक्त तुपाचा वापर, कंपनीच्या मालकाला ईडीने केली अटक

Ancient Ganesh Idol : गणेशोत्सवात अद्भुत योग! 1800 वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या आलास गावात सापडली 1200 वर्षे जुनी चालुक्यकालीन प्राचीन गणेशमूर्ती अन् नंदी

Latest Marathi News Update : आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर बडतर्फीची कारवाई

SCROLL FOR NEXT