farnal
farnal 
जळगाव

अग्नीच्या मडक्‍यातून निघाला धूर...अन्‌ अंत्यविधी सोडून साऱ्यांची पळापळ

सुनील पाटील

चोपडा : आडगाव (ता. चोपडा) येथील रहिवासी असलेले खंडू तुकाराम पाटील (वय 82) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दुपारी एकच्या सुमारास घरापासून निघून दीडच्या सुमारास गावच्या स्मशानभूमीत पोहचली. मयताचा मुलगा भास्कर पाटील हे केस देत असतांना त्यांच्या हातातील मडक्‍यातील अग्नीचा निघालेल्या धुरामुळे झाडावरील मधमाशांचे पोळ उठले आणि मधमाशांनी प्रेतयात्रेत सहभागी अनेकांना जखमी केल्याची घटना घडली आहे. 

आडगाव येथील सानेगुरुजीनगरातील खंडू पाटील यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. कोरोना व्हायरस असल्याने अंत्ययात्रेला तशी गर्दी कमीच होती. मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत तयारी होवून दुपारी एकच्या सुमारास अंत्ययात्रेला सुरवात झाली. प्रेतयात्रा स्मशानभूमीत पोहचली; येथे अगोदर आलेल्यांनी अग्निडाग देण्याची सर्व तयारी करून ठेवली होती. परंतु अग्निडाग देण्यापुर्वी मुलगा भास्कर पाटील हे हातातील मडके घेवून केस देण्यासाठी बसले. 

धुर गेला वर आणि... 
भास्कर पाटील यांच्या हातातील अग्नी असलेल्या मडक्‍यातून निघालेला धुर वर गेला. हवेमुळे धुर इतरत्र पसरला आणि यामुळे झाडावर बसलेले मधमाशांचे पोळ अचानक उठले. यानंतर मधमाशांनी प्रेतयात्रेत सहभागी असलेल्या वीस ते पंचवीस लोकांना चावा घेतल्याने ते जखमी झालेत. प्रवीण पाटील यांच्या कानात मधमाशी शिरल्याने त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी त्यांच्यावर डॉ. मनोज पाटील, डॉ. पंकज पाटील उपचार करत कानात शिरलेली मधमाशी बाहेर काढली. तर काही जणांवर गावातील डॉ. किरण पाटील यांनी उपचार केलेत. यात कवी रमेश पाटील, भागवत पाटील, रामकृष्ण पाटील, कैलास पाटील (आव्हाणे ता. जळगाव), गजानन पाटील, ईश्वर पाटील, सुधाकर पाटील, अमोल पाटील, प्रशांत पाटील, मंगल पाटील, कैलास पाटील, प्रभाकर पाटील, गोपाल पाटील जखमी आहेत. 

भिल्ल समाजाच्या व्यक्तीने केला अंत्यविधी 
खंडू पाटील यांचे अंत्यविधी करण्यापूर्वीच मधमाशांनी हल्ला केल्याने प्रेतयात्रेत सहभागी झालेल्या गावकऱ्यांनी पळ काढला. यात जिकडे रस्ता दिसेल तिकडे लोकांनी पळ काढत जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. तरी देखील वीस ते पंचवीस गावकरी यात जखमी झाले. यामुळे स्मशानभुमीत प्रेत तसेच लाकडांवर पडून होते. कोणीच जाण्यासाठी तयार होत नव्हते. मात्र दुपारी चारच्या सुमारास गावातील भिल्ल समाजाच्या व्यक्‍तीने खंडू पाटील यांचा अंत्यविधी पुर्ण केला. 


संपादन : राजेश सोनवणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT