sowing of dadar 
जळगाव

दादरची पेरणी, तीही ट्रॅक्टरने! 

बालकृष्ण पाटील

गणपूर (जळगाव) : रब्बी हंगामात खेतले जाणारे कोरडवाहू पीकांमधील एक महत्‍त्‍वाचे पीक म्‍हणजे दादर आहे. खानदेशात याची मोठ्या प्रमाणात लागवड होत असते. याची पेरणी करताना जास्‍त खोल नको किंवा जास्त ओलावा देखील चालत नाही. यामुळे बैलजोडीच्या सहाय्याने दुसे लावून दादरची पेरणी केली जात असते. पण याला फाटा फोडत ट्रॅक्‍टरच्या सहाय्याने प्रथमच दादरची पेरणी करण्याचा प्रयोग करण्यात आला आहे.

दादरची पेरणी म्हणजे रब्बी हंगामाच्या पेरणीला तुरळक सुरवात झाली आहे. शिंदखेडा तालुक्यात ही पेरणी सुरू झाली असून बीबीएफ तंत्राचा वापर करून विरदेल येथील डॉ. जितेंद्र पेंढारकर यांच्या शेतात ही पेरणी ट्रॅक्टरच्या साहाय्याने करण्यात आली. काही भागात या पिकाला शाळू म्हणतात. कोपरगाव, दुधमोगरा रेवती, मालदांडी 35, पंढरपुरी असे वाण खानदेशात पेरले जातात. 

म्‍हणूनच पेरणीसाठी बैलजोडी
पूर्वापार नाई (एक नळी) किंवा दुसे (दोन नळ्या) वापरून ही पेरणी खानदेशात केली जाते. गरताडी दादर जुन्या काळात प्रसिद्ध होती. पूर्वापार नाईने ही पेरणी होत असली तरी शेतीची सर्वच कामे आता यांत्रिक पद्धतीने होत असल्याचे दिवसेंदिवस दिसून येत आहे. ट्रॅक्टरने दादरचीही पेरणी होऊ लागली त्याचे हे एक उदाहरण. परंतु, दादरची पेरणी करताना ती जास्‍त खोल किंवा जास्‍त ओलाव्यात पडू नये याची काळजी घेतली जात असते. असे केल्‍यास दादरचे पीक चांगले उगवत असते. 

दादरची भाकर खाण्यास गोड
ज्‍वारी या धान्य प्रकारातील दादर हा एक प्रकार आहे. ज्‍वारीची लागवड पावसाळ्यात अर्थात खरीप हंगामात होत असते. तर दादरची पेरणी ही कोरडवाहू म्‍हणून रब्‍बी हंगामात होत असते. ज्‍वारीच्या तुलनेत दादर नरम असून, खाण्यात दादरची भाकर गोड लागत असते. यामुळे ज्‍वारीपेक्षा दादरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असतो.

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? सरकारचे संसदेत मोठं स्पष्टीकरण

Delhi Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदींची शरद पवार गटाच्या आठ खासदारांशी भेट; मतदारसंघ पुनर्रचनेच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा; राज्यात पावसाची शक्यता, पुढील ५ दिवसांचा अंदाज

Marathi News Live Updates: मुंबई आणि उपनगर परिसरात पहाटेपासून मुसळधार पाऊस, लोकल वाहतुकीला ब्रेक

Rahul Gandhi: संसदेत येण्याचे धैर्य शहांमध्ये नाही: राहुल गांधी, विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसची सरकारवर टीका

SCROLL FOR NEXT