जळगाव

अधिकारी आदिवासी कुटुंबांना घरोघरी रेशन कार्डांचे वाटप !

सुनील पाटील

चोपडा : तालुक्यातील बहुतांश आदिवासी कुटुंबांकडे अजूनही रेशन कार्ड नाहीत, अशा सर्व ‘पेसा’ कुटुंबातील व्यक्तींना सहा ऑक्टोबरला गावोगावी जाऊन रेशन कार्ड वाटप केले जाणार असल्याची माहिती तहसीलदार अनिल गावित यांनी दिली. 

येथील तहसील कार्यालयात तहसीलदार अनिल गावित यांच्या अध्यक्षतेखाली रेशन व रोजगारासंदर्भात लोकसंघर्ष मोर्चाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. या वेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, बुधा बारेला, धर्मा बारेला, ताराचंद पावरा, प्रदीप बारेला, अनिल सपकाळे, गाजू बारेला आदी उपस्थित होते. 

तालुक्यात ‘पेसा’ गावे असून, अनेक गावे नवसंजीवनी योजनेत येतात व त्या सर्व गावांमधील आदिवासी जमातीच्या कुटुंबांना, आदिवासी मजूर, शेतमजुरांना रेशन कार्ड उपलब्ध करून देण्याबाबत सुप्रिम कोर्टाने निकाल दिला आहे. त्यानुसार तालुक्यातील आदिवासी लोकांना रेशन कार्ड उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करावे, अशी सूचना प्रतिभा शिंदे यांनी मांडली. प्रत्येक गावातील गरजू लोकांचे अर्ज लोकसंघर्ष मोर्चाचे कार्यकर्ते गावोगाव जाऊन आज भरून घेत आहेत व सहा ऑक्टोबरला गावोगाव या कार्डांचे वाटप केले जाईल. या कामात मोर्चाचे कार्यकर्ते तालुक्यातील ११६ गावांमध्ये जाऊन लोकांचे अर्ज भरून घेत शासनाला पूर्ण सहकार्य करतील. रेशन कार्डसाठी चलन भरण्याची रक्कम आदिवासी विकास विभाग उपलब्ध करून देईल, असेही श्रीमती शिंदे यांनी स्पष्ट केले. तहसीलदार गावित यांनी हा विषय तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले व तत्काळ कार्यवाहीदेखील सुरू केली. 


रेशन इतकाच महत्त्वाचा विषय हा रोजगाराचा असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण महाराष्ट्रातील अर्थव्यवस्था अत्यंत खिळखिळी झाली आहे व लोकांची क्रयशक्तीही संपली आहे. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने ‘मनरेगा’अंतर्गत गावागावांत रोजगार आराखडे बनविण्यासाठी २५ सप्टेंबरला ग्रामसेवक, तलाठी व वनहक्क समितीचे अध्यक्ष व सरपंच यांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. त्यानंतर रोजगार आराखडे गावागावांत तयार केले जातील.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistani Spy Case: 'ई-रिक्षावाली' निघाली पाकिस्तानी हेर! मीरा ठाकूरचा मुंबई पोलीसशी काय संबंध? वाचा पूर्ण प्रकरण

Latest Marathi News Live Update : देशात पुन्हा लॉकडाऊन लागू शकतो, ४०० चा सिलिंडर १,१०० रुपयांवर...; ममता बॅनर्जी संतापल्या

India Lockdown Strategy : मध्यपूर्वेत तणाव ! भारतात लॉकडाऊन लागणार ? पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचे मोठे विधान

Rinku Singh Video: लवकरच येऊन जॉइनिंग लेटर घेईन'; रिंकू सिंहने योगींचे मानले आभार! उपकर्णधारपदाच्या जबाबदारीसह नव्या इनिंगला सुरुवात

Hemant Godse Video Viral : भोंदूबाबा अशोक खरात माजी खासदाराचा हात बघून भविष्य सांगतानाचा व्हिडिओ व्हायरल; लोकसभा निवडणुकीपूर्वी भविष्य जाणून घेतल्याची चर्चा!

SCROLL FOR NEXT