जळगाव

राज्यात ऊस गाळप अंतिम टप्प्यात,एक हजार लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

बालकृष्ण पाटील

गणपूर (ता चोपडा):  राज्यातील यावर्षीचा ऊस गाळप हंगाम उत्तरार्धात आला असून राज्यातील शंभराहून अधिक कारखान्यांचे गाळप आटोपले आहे.मार्च अखेर पर्यंत राज्यातील 189 साखर कारखान्यांनी 958 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून 1000.71 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

हंगामाच्या सुरवातीला राज्यातील 95 सहकारी आणि 94 खासगी कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता ,त्यापैकी 101 कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे.राज्याचा साखर उतारा 10.45 असला तरी कोल्हापूर विभागाचा सर्वाधिक म्हणजे 11.96 टक्के तर पुणे विभागाचा 10.86 इतका आहे.सोलापूर विभागाचा 9.37 तर नगर विभागाचा 9.74 इतका साखर उतारा आहे.औरंगाबाद विभागाचा 9.55 तर नांदेड विभागाचा 9.98 टक्के साखर उतारा असून अमरावतीचा 8.93 साखर उतारा असून नागपूर विभागाचा 9 टक्के आहे.

खानदेशात ऊसाची तोड सुरूच

खानदेशात अजून ऊस तोड सुरू असून धुळ्यात शिरपूर मधील दत्तप्रभु ऍग्रो मध्ये लाखाच्या आसपास गाळप झाले असून नंदुरबार मधील सातपुडा तापी मध्ये 4लाख 43 हजार 180 मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन 4 लाख 11 हजार 375 क्विंटल साखर उत्पादित झाली आहे.तर नवापूर मधील आदिवासी सहकारी साखर कारखान्यात एक लाख 14 हजार 746 मेट्रिक टन ऊस गाळप झाला असून 96 हजार 115 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.आयान मल्टी ट्रेड मध्ये 3,93,390 मेट्रिक टनाचे गाळप होऊन 3,84,545 क्विंटल साखर उत्पादित झाली आहे.जळगाव मधील संत मुक्ताबाई शुगर ने 3,39,915 लाख टन ऊस गाळप करून 3,36,750 क्विंटल साखर उत्पादित केली आहे.खानदेशात अजून काही भागात ऊस उभा असून ऊसतोड संथ गतीने सुरू आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? सरकारचे संसदेत मोठं स्पष्टीकरण

Delhi Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदींची शरद पवार गटाच्या आठ खासदारांशी भेट; मतदारसंघ पुनर्रचनेच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा; राज्यात पावसाची शक्यता, पुढील ५ दिवसांचा अंदाज

Marathi News Live Updates: मुंबई आणि उपनगर परिसरात पहाटेपासून मुसळधार पाऊस, लोकल वाहतुकीला ब्रेक

Rahul Gandhi: संसदेत येण्याचे धैर्य शहांमध्ये नाही: राहुल गांधी, विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसची सरकारवर टीका

SCROLL FOR NEXT