जळगाव

सातपुडा जंगलात पेटला वणवा; चार दिवसांत कोट्यवधींच्या वनसंपत्तीची होळी

सकाळवृत्तसेवा

लासूर (ता. चोपडा)  : परिसराला जिल्ह्याचे वैभव असलेला विस्तीर्ण असा सातपुडा पर्वत लाभलेला आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वसंत ऋतूची चाहुल लागताच या वनात वणव्याची दुर्दैवी मोहीम सुरू आहे. त्यामुळे या सातपुड्याचे निव्वळ टेकड्यांचे जंगल या दिशेने वारंवार पेटणाऱ्या वणव्यांमुळे वाटचाल सुरू आहे. वन विभागाने आठ दिवसांआधीच जेमतेम वणव्यांची मालिका थांबविली होती. मात्र, लासूर गावाला लागून असलेल्या गत तीन ते चार दिवसांपासून कंपार्टमेंट नंबर २६१ मध्ये भयंकर स्वरूपाचा वणवा सुरू असून, यात कोट्यवधींची वनसंपत्ती जळून राख होत आहे. तसेच असंख्य पशुपक्ष्यांना आपला जीव गमवावा लागत आहे.
 

वणव्याची मागील काही दिवसांपासून सलग मालिका सुरू असताना दुपारपासून सुरू असलेला भडका दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत विझविण्यात देखील वन विभागाला पूर्णपणे अपयश येत असून, सातपुडा नष्ट होण्याच्या दिशेने दुर्दैवी वाटचाल सुरू आहे. हा वणवा जंगल तस्करांकडून लावला जात असून, त्यांच्या या कृत्यामुळे जंगलातील विस्तीर्ण पट्टेचा पट्टे नष्ट होत आहेत. यात वनसंपत्ती, प्राणी, वनौषधी नामशेष होत चालले आहे. तरी जंगल तस्करांवर कठोर कार्यवाही होऊन हा गंभीर प्रकार थांबविण्याची मागणी निसर्गप्रेमींकडून सुरू आहे.

डिंक गोळा तस्करांकडून लावली जाते आग

लासूर परिसरातील वणव्यासंबंधी क्षेत्रीय वन क्षेत्रपाल दत्तात्रय लोंढे तसेच वनपाल सीमा पटाईत यांच्याशी संपर्क केला असता त्यांना कोरोनाची लागण होऊन क्वारंटाइन असल्याची माहिती मिळाली, तसेच ही आग डिंक गोळा करणाऱ्या तस्करांकडून लावली जात असून, वणवा आटोक्यात आणण्यासाठी कर्मचारी पाठवले असल्याचे कळाले. परंतु तीन ते चार दिवसांपासून सलग आग लावली जात असताना तसेच डिंक काढणाऱ्यांमार्फत आग लावली जात असल्याचा अंदाज असताना तस्करांवर कार्यवाही करण्यात तसेच दुपारपासून लागलेला वणवा दुसऱ्या दिवशी देखील आटोक्यात आणण्यात वन विभाग पूर्णपणे हतबल ठरत असल्याचे चित्र आहे. 

आवर्जून वाचा- आईला म्‍हणाला मी येतो; पण आली त्‍याच्या मृत्‍यूची बातमी

वणवा पेटला असल्याची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांना पाठविले. बऱ्याच स्टाफला कोरोनाची लागण झाल्याने इतर रेंजमधील कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी लागत आहे. स्थानिकांमध्ये देखील यासंबंधी जनजागृती होऊन मदतीची अपेक्षा आहे. 
- पद्मनाभा, उपवनसंरक्षक, यावल वन विभाग 

 

मला कोरोना लागण झाल्याने मी सध्या क्वारंटाइन आहे. डिंक गोळा करणाऱ्यांकडून ही आग लावली जात असल्याचा अंदाज आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. 
- दत्तात्रय लोंढे, वनक्षेत्रपाल, चोपडा 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Second Setback : हसन मुश्रीफांना सलग दुसरा राजकीय धक्का! जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा कांबळेंचा जातीचा दाखला अवैध

सोने-चांदीच्या भावात विक्रमी घसरण, ३ वर्षांची वाढ झाली कमी; जाणून घ्या आज किती भाव

Latest Marathi News Live Update : विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना हुलकावणी, धूम ठोकून फरार, परिसरात भीतीचे वातावरण

Pune Trekking : ट्रेकर्ससाठी महत्त्वाचा इशारा! पर्यटकांनो साहस करा; पण जपून, निसर्गसौंदर्याचा आनंद लुटताना काळजी घेण्याचे आवाहन

Fifa World Cup 2026 : यंदाचा वर्ल्ड कप ब्राझीलचाच! Vinícius Jr. मुळे जुळून आलाय भन्नाट योगायोग; इतरांना धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT