जळगाव

अनाथ महिलेचा बनला सहारा, आठ वर्षे सांभाळून शेवटचा अंत्यविधी पार पाडला ! 

सुनील पाटील

चोपडा:  जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे, निराधार आभाळाचा तोच भार आहे...! या उक्तीप्रमाणे चहार्डी (ता चोपडा) येथील खंडूबाबा नगर भागात एक अनाथ महिला साधारण 40 वर्षांपासून तेथेच राहत होती.त्या अनाथ महिलेचा सहारा बनले चहार्डी येथील "युवा एकता मित्र मंडळ"या युवकांनी तिला नुसता सहारा दिला नाही तर तिला एक झोपडी वजा पक्के छताचे घर बनवून हक्काचे छत दिले एवढेच नाहीतर वृद्धपकाळाने तिचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले तर सर्व अंत्यविधी व दशक्रिया विधी कार्यक्रम या युवा एकता मित्र मंडळातील तरुणांनी करून एक गावपुढे आदर्श निर्माण केला.

दिवसेंदिवस तरुण पिढी कुठे तरी व्यसनाधीन होत चालली आहे,कुठे तरी भरकटत चालली आहे असे म्हटले जाते मात्र यास युवा एकता मित्र मंडळातील युवक आदर्श ठरत आहेत.चहार्डी (ता चोपडा जि.जळगाव ) येथील खंडूबाबा नगर भागात विमलबाई हेमराज पाटील (78) ही अनाथ महिला तब्बल 40 वर्षांपासून राहत होती.

सुरुवातीला ती गावातील उच्चभ्रू लोकांकडे धुणी,भांडे घासायचे काम करीत आपला उदरनिर्वाह चालवीत होती खंडूबाबा नगर भागात भाड्याचा घरात राहत होती  आणि आपले पोट भरत होती . मात्र वय झाल्याने तिच्या कडून कोणतेच काम होत नव्हते.


साधारण 8 वर्षांपासून विमलबाई यांच्याकडून काहीही काम होत नव्हते आणि त्यांना चालताही येत नव्हते युवा एकता मित्र मंडळ खंडूबाबा नगर यांचा मदतीने सामाजिक कार्यकर्ते भूषण कोळी यांनी लक्ष्मण कालिदास कोळी यांचा मालकीचा जागेत एक झोपडी बनवून विमलबाई यांना हक्काचे छत मिळवून दिले होते.एवढेच नाहीतर त्या महिलेस 8 वर्षांपासून सकाळ संध्याकाळचे जेवण दिले. आजारी पडल्यास दवाखानाही केला.

5 रोजी विमलबाई यांचे निधन झाले विमलबाई यांचा पश्चात कोणीही नव्हते (अनाथ महिला)युवा एकता मित्र मंडळाचे सदस्य यांनी अंत्य विधी साठी लागणारा बाजार केला.तिची तिरडी सजवून विमलबाई यांची शेवटची तयारी केली अग्निडाग ही मित्र मंडळाचा सदस्य उदय पवार तसेच चार खांदेकरी गुलाब रायसिंग,समाधान कोळी,शरद रायसिंग,प्रशांत रायसिंग,यांनी विधिवत अंत्यविधी केला.एव्हढेच नाही तर पाचव्या दिवशी दशक्रिया विधी करण्यात आला युवा एकता मित्र मंडळाचा सदस्यांनी मुंडन केले.विमलबाई यांच्या प्रतिमेची पूजा करून यांना श्रद्धांजली वाहिली.


अशा एका अनाथ महिलेस युवकांनी सहारा देत तिचा शेवटही चांगला केला.या युवा एकता मित्र मंडळाचे सर्व  सदस्यांचे अनेकांनी अभिनंदन केले व एक आदर्श नवयुवकांपुढे निर्माण केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT