जळगाव

चोपडा तालुक्याला वादळ,पावसाने झोडपले; शेतमालासह घरांचे नुकसान

सकाळ डिजिटल टीम

चोपडा : तालुक्यातील काही भागात आज शुक्रवारी (ता. २८) रोजी संध्याकाळी झालेल्या वादळी (Storm) वाऱ्यासह पावसाने (Rain) मोठ्या प्रमाणात घरांचे व शेतमालाचे (Agriculture) नुकसान झाले आहे. तालुक्यात अचानक वादळी पाऊस झाल्याने शेतातील चारा, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यासोबतच घरांची पत्रे उडाली तर काही ठिकाणी वादळाने घरावर वृक्ष पडले आहेत. विजेचे खांब वाकून विजेच्या तारा तुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवित हानी झाली नसल्याची माहिती तालुका प्रशासनाकडून (Administration) देण्यात आली आहे.

(chopda taluka storm rain damage agriculture farming crop)

शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाला सुरुवात झाली. यात वेले आखतवाडे, वर्डी, विषणापूर, यासह तालुक्यातील पूर्वभागात वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. जोरदार पावसाने झोडपल्यामुळे शेतातील केळी, ऊस, यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात, वेले येथील खटाबाई शिवराम भिल या गरीब महिलेच्या घरावर झाड कोसळल्याने पूर्ण पत्र्याचे घर बसून गेले, सखवार विनायक पाटील यांच्या घराची पत्रे उडून गेल्याने सर्व संसारोपयोगी वस्तू उघड्यावर पडल्याने त्या खराब झाल्यात. बुधा आत्माराम पाटील यांच्या चाऱ्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उपसरपंच दीपक पाटील यांच्या दादरचे नुकसान झाले.

सोसाट्याचा वारा

सोसाट्याचा वारा तसेच मुसळधार पाऊस असल्याने अनेकांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतात काढणीवर आलेल्या पिकांना पावसाचा जोरदार फटका बसला आहे. आधीच लॉकडाउन असल्याने शेतकऱ्यांची दैना झाली आहे. महागड्या खतांचा मारा करून पिकांना जगविण्यात येत असताना दुसरीकडे अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: सुरुवातीच्या मोठ्या धक्क्यांनंतर सूर्यकुमारचे दमदार अर्धशतक, तिलकनेही दिली भक्कम साथ

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT