salun 
जळगाव

केस कापण्यासाठी जाताय; मग अगोदर हे पहा...सलुन व्यावसायिकांनी घेतलाय हा निर्णय

सुधाकर पाटील

भडगाव : लॉकडाउनंतर नाभिक बांधवांना अटीशर्ती घालून सलून व्यवसायाची परवानगी दिली. घातलेल्या अटीमुळे व ग्राहकांची सुरक्षिततेमुळे सलून व्यवसायीकांचा खर्च वाढल्याने दरात ही पन्नास टक्केपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मात्र याचा फटका ग्राहकांना सहन करावा लागत आहे. संपूर्ण राज्यात ही दरवाढ करण्याचा निर्णय सलून व्यवसायिकांनी घेतला असल्याचे नाभिक महामंडळाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष एकनाथ शिरसाठ यांनी सांगितले. राज्यात १०-१२ लाख, तर खानदेशात ५५-६० हजार सलून व्यावसायिक आहेत. 

कोरोनाचा संबध हा थेट चेहऱ्याशी जास्त असल्याने शासनाने पहील्या टप्प्यातील अनलॉकमध्ये सलून व्यवसायाला परवानगी दिली नव्हती. मात्र त्यानंतर शासनाने काही अटी शर्तींवर सलून व्यवसायाला परवानगी दिली. शासनाने ग्राहकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने अटी घातल्यामुळे त्यांच्या व्यावसायिक खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात कटींग, दाढीचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्‍याचा फटका ग्राहकांना बसत असल्याचे चित्र आहे. 

पन्नास टक्के दरवाढ ! 
सलून व्यवसायिक प्रत्येकांच्या कटींगसाठी वेगवेगळा कापड वापरतात. एक कापड एकदाच वापरावा लागतो. नॅपकीनचा ही खर्च वाढला आहे. शिवाय प्रत्येक वेळी त्यांना ग्राहकांची खुर्चीला सॅनीटायझर करावी लागते. केस कर्तन करताना फेस शिल्ड, मास्क, हातात पंज आदी संरक्षणात्मक बाबींचा वापर करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या खर्चात वाढ झाल्याचे सलून व्यवसायिकाचे म्हणणे असल्याने दरवाढीचा निर्णय घेतला आहे. भडगाव शहरात तब्बल जुन्या दराच्या तुलनेने पन्नास टक्के दरवाढ केली आहे. कटींगचे दर चाळीसवरून ६० रूपये करण्यात आले आहे. तर जळगाव शहरात साधी कटींगचा दर १००-१२०, तर स्टाईल कटींगसाठी १३०-१५० रूपये मोजावे लागत आहे. 

व्यवसाय मंदावला 
लॉकडाउनंतर व्यवसायाला परवानगी दिली असली तरी व्यवसाय मोठ्याप्रणात मंदावला असल्याचे सलून व्यवसायिकांचे म्हणणे आहे. सलून दुकानात फक्त हेअर कटींगसाठीच परवानगी दिली आहे. त्यामुळे ग्राहक संख्येत घट झाली आहे. काही जण कोरोनाच्या भीतीने अजुनही सलून दुकानात केस कापायला तयार नाही. अनेकांनी सुरक्षितता म्हणुन घरीच टक्कल करणे पसंद केल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे दुकान सुरू असली तरी ग्राहक येत नसल्याने घर आणि दुकानाचे भाडे कसे द्यायचे? असा प्रश्न या व्यवसायाकांकडुन विचारला जात आहे. 
 
...पण ग्राहकांना बसतोय फटका 
शासनाने लोकांच्या सुरक्षितेसाठी सलून व्यावसायिकांना परवानगी दिली. मात्र त्यामुळे ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहे. शासनाने घालून दिलेल्या अटीमुळे आमचा खर्च वाढला आहे. त्यामुळे दरवाढ करण्यात आल्याचे सलून व्यवसायिकांचे म्हणणे आहे. मात्र याचा फटका ग्राहकांना बसला असल्याचे चित्र आहे. तर वाढलेल्या दरामुळे दुकानदारांच्या व्यवसायांवरही त्याचा परीणाम झाल्याचे दिसून येत आहे. 
 
शासनाने काही अटी घालून दिल्या आहेत. यामुळे दुकानदारांचा खर्च वाढला आहे. म्हणून काही प्रमाणात दरवाढ करण्यात आली आहे. 
-एकनाथ शिरसाठ, अध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ उत्तर महाराष्ट्र 


सॅनीटायझर व इतर खर्च वाढल्याने राज्यात सलून व्यावसायिकांनी दरवाढीचा निर्णय घेतला आहे. करण्यात आलेली दरवाढ इतका दुकानदारांना खर्चच लागणार आहे. 
-किशोर सूर्यवंशी, राज्य कार्याध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ


संपादन : राजेश सोनवणे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT