aasha worker.jpg 
जळगाव

भुसावळला आशा स्वयंसेविकांनी केला हा निर्धार; सहा महिन्याच्या मानधनासह सुरक्षिततेची मागणी

सकाळवृत्तसेवा

भुसावळ : शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहेत. यावर उपाययोजना म्हणून आरोग्य विभागातर्फे नागरिकांच्या आरोग्य तपासणीचे काम आशा स्वयंसेविकांना देण्यात आले आहे. मात्र, त्यांचे रखडलेले मानधन, वारंवार होणारे हल्ले आणि अधिकाऱ्यांकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक लक्षात घेता, त्यांनी कामबंद ठेवण्याचा निर्धार केला आहे. यासंदर्भात आज (ता. १२) प्रांताधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले आहे. 

भुसावळ तालुक्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या तीनशेच्यावर गेली आहे. तर तीसहून अधिक रुग्णांचा बळी गेला आहे. यापाश्‍र्वभूमीवर आरोग्य विभागातर्फे आशा स्वयंसेविकांना घरोघरी जाऊन आरोग्य सर्व्हेक्षणाचे काम दिले आहे. मात्र, आशा स्वयंसेविकांना कुठलाही आरोग्य कर्मचारी सोबत नसताना काम करावे लागत आहे. तरी देखील बाधित क्षेत्रात जाऊन आतापर्यंत सर्वेक्षण केले. आरोग्य विभागाकडून वारंवार धमकी दिली जाते. कुठलेही सहकार्य केले जात नाही. तसेच अल्पसंख्याक भागात सेविकांचे मोबाईल हिसकावून कागदपत्रांचे नुकसान केले जाते. अशा वेळेस कुठलीही सुरक्षा पुरविली जात नसल्याची तक्रार आशा स्वयंसेविकांनी केली आहे. 

विम्याची रक्कम मिळेना 
आशा स्वंयसेविकांना घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम दिले आहे. यादरम्यान, त्यांचा मृत्यू झाल्यास ५० लाखांचा विमा शासनाने दिला आहे. मात्र, खडा (ता. भुसावळ) येथील आशा स्वंयसेविकेचे मृत्यू होऊनही त्यांच्या परिवारास विम्याची रक्कम मिळालेली नाही. जीव धोक्यात घालून काम करावे लागूनही शासनाकडून कुठलीही मदत मिळत नसल्याने आशा स्वयंसेविकांनी रोष व्यक्त केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drought in Maharashtra : दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Asian Games Cricket : नेपाळचा ऐतिहासिक विजय, अफगाणिस्तानला नमवले; ब गटात हाँगकाँगचा विजय, भारताला कोण भिडणार?

२४ किलो वजन घटवलं! वनिता खरातने सांगितलं डाएटचं सीक्रेट; म्हणाली, ‘आज माझा चीट डे’

Maharashtra Ganesh Visarjan Live: मिरजेतील पहिल्या गणपतीचे विसर्जन; नदीवेस शिवाजी गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीसाठी गणेश तलावावर जय्यत तयारी

Beed Ganesh Visarjan: मिरवणुकीत नाचा ; पण डीजे अजिबात चालणार नाही;प्रशासनाचा इशारा ; चार विहिरींवर विसर्जनाची सोय, मार्गावर हायमास्टचा झगमगाट

SCROLL FOR NEXT