जळगाव

कापूस खरेदीला गणेश चतुर्थी साधला मुहर्त

दगडू पाटील

धरणगाव ः येथील श्री जिनिंग मध्ये आज गणेश चतुर्थीच्या मुहर्तवर कापूस खरेदीला प्रारंभ झाला मुहर्तचा भाव 5150 श्री जिनिंग मध्ये प्रति क्विंटल भाव देण्यात आला दरवर्षी प्रमाणे धरणगाव तालुक्यातील जीनिंग उद्योगात गणेश चतुर्थीच्या मुहार्तवर कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली यावेळी खरेदीचा शुभारंभ काटा पूजन करून करण्यात आला श्री. जिनिंग मध्ये काटा पूजन नयन शेठ गुजराथी,जीवन सिंह बायस,माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी,सागर कर्व,प्रवेश गुजराथी,निखिल बायस,नीलेश चौधरी या संचलकाच्या हस्ते करण्यात आले महर्तावर पहिल्याच दिवशी साधारण 3000 क्विंटल कापूस ची आवक श्री जीनिह मध्ये होती.

जी एस कॉटन व बिजसानी जिनोग मध्ये ही खरेदी चे उद्घाटन करण्यात आला यावेळी जुना कापूस देखील विक्री साठी आलेला होता जुन्या काप्सास 4700 ते 5150 रुपया पर्यंत भाव देण्यात आला भावाची. थोडी फार तफावत मालाच्या प्रतवारी नुसार बदलते असे व्यापारी, जिनिंग संचालक यांचे म्हणणे आहे.

कापूस खरेदीच्य या उद्घाटन समारंभास परिसरातील जिमिग उद्योजक ,अंजनी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याच प्रमाणे राज्यासह बाहेरील राज्यातील कॉटन ब्रोकर उपस्थित होते. यात दिपक बजाज मबई,सोहनलाल बुऱ्हाणपूर,प्रविण पाटील देवेंद्र मालवीय जळगाव, राम भाई जडेजा अजंद,महेश कुमार शर्मा,शिव कुमार शर्मा,राम नाथ ,बिपिनभाई चौधरी,दिपक शाह,यांच्यासह जिनिह प्रेसींग चे उद्योजक उपस्थित होते.


परिसरातील शेतकरी,व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देखील या कार्यक्रमास हजेरी लावली कार्यक्रम यशस्वीतेसाठी गजानन साठे,चेतन गुजराथी,यांच्यासह श्री जीमिग चे व्यवस्थापनाने परिश्रम घेतले उपस्थित शेतकऱ्यांसाठी मिष्टान्न भोजन व्यवस्था करण्यात आली होती.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली महामंडळाची बस; गावकऱ्यांनी वाजत-गाजत केलं स्वागत...

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Aadul News : कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन; पैठण तालुक्यातील एकतुनी येथील घटना

नेटीझन्स भडकल्यावर नोराचं ते अश्लील गाण्याचं हिंदी व्हर्जन तात्काळ हटवलं पण इतर भाषांमध्ये जैसे थे !

SCROLL FOR NEXT