जळगाव

लोकवर्गणीतून ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेड...कामाचा शुभारंभ ! 

दगडू पाटील

धरणगाव ः कोरोना विषाणूमुळे लोक परेशान झालेले आहेत, केंद्र व राज्य सरकार त्यांच्या परीने कसोशीने प्रयत्न करीत आहेत, आपण सुद्धा समाजाचे व गावाचे काही तरी देणं लागतो, याच उद्देशाने कोणताही साथीच्या आजार, अपघात केस बरे होण्यासाठी अकरा बेड, ऑक्सिजन पाईप लाइन, मोठे जनरेटर, तसेच मल्टीपॅरामिटर, मॉनिटर, ईसीजी मशीन, आरओ मशीन, पोर्टेबल एक्सरे मशीन अशा सुविधा करावयाच्‍या आहेत. आपल्या एरंडोल विभागाचे, विभागीय अधिकारी तथा कोविड- १९ चे नोडल अधिकारी विनय गोसावी यांनी सांगितले की गावातील राजकीय पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यापारी असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन, डॉक्टर असोसिएशन, वकील संघ, दुकानदार, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक अशा विविध संघटना तसेच दानशूर व्यक्ती यांनी मदतीसाठी हातभार लावावा असे आवाहन केले आहे . 

धरणगाव ग्रामीण रुग्णालयात ही सुविधा कोविड संपल्यानंतर सुद्धा कायमस्वरूपी होणार आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत आज धरणगाव नगरीचे नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कामाचे अंदाज पत्रक घेऊन कामाचा शुभारंभ करण्यात आला, प्रांताधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी २५ हजार, गुलाबराव वाघ व शिवसेना धरणगाव २५ हजार, नीलेश चौधरी लोकनियुक्त नगराध्यक्ष व शिवसेना नगरसेवक २५ हजार तसेच अधिकारी वर्गात प्रांताधिकारी विनय गोसावी १५ हजार, तहसीलदार ११ हजार रुपये व मुख्याधिकारी जनार्दन पवार ११ हजार रुपये ताबडतोब जमा करण्यात आले.

काही राजकीय पदाधिकारी सुद्धा या कामी मदत करणार आहे असे तहसीलदार यांनी सांगिते. या कामाच्‍या अंदाज पत्रकाचा शुभारंभ प्रसंगी विभागीय अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीन कुमार देवरे, समन्वय समितीचे अध्यक्ष गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष नीलेश चौधरी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश चौधरी, माजी नगराध्यक्ष पी. एम पाटील, नगरसेवक वासुदेव चौधरी, भागवत चौधरी, विनय भावे, विलास महाजन विजय महाजन, राजेंद्र महाजन, संजय चौधरी, बाळासाहेब जाधव, राहुल रोकडे, वाल्मीक पाटील, अरविंद चौधरी, गोपाल पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

संपादन-भूषण श्रीखंडे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT