fir 
जळगाव

धुळेःराष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

धुळे : एलईडीप्रश्‍नी महापालिकेत शरम करो आंदोलनप्रकरणी (Movement) राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) शहराध्यक्ष रणजित भोसले यांच्यासह आंदोलक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला. याबाबत पोलिस उपनिरीक्षक चंदू पाटील यांनी शहर पोलिस (Police Case) ठाण्यात फिर्याद दिली.


एलईडीप्रश्‍नी महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुरुवारी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन झाले. त्यात लोकसेवकाच्या आदेशाची अवहेलना करून नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे श्री. भोसले, ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष कैलास चौधरी, महेंद्र शिरसाठ, कुणाल पवार, उमेश महाजन, संजय बगदे, राजू चौधरी, सलीम शेख लंबू, प्रमोद साळुंखे, वामन मोहिते, विजय वाघ, अस्लम खाटीक, कुंदन पवार, रईस काझी, मंगेश जगताप आदींसह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल झाला.


यासंदर्भात श्री. भोसले म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेसच्या धुळे महानगर शाखेने मनपाकडून एलईडी खरेदीमध्ये झालेला गैरप्रकार, अनियमितता आदींबाबत आक्रमक आंदोलन केले. आंदोलन जनते‍नासाठी होते. त्यामुळे असे शंभर गुन्हे दाखल झाले तरी चालतील. पण जोमाने पक्षाचे काम सुरूच राहील. अशा गुन्ह्यांना व भाजपच्या दडपशाहीला राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते घाबरणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT