st bus 
जळगाव

धुळे: रोजच्या ३४० फेऱ्यांना ‘ब्रेक’; सणासुदीत प्रवाशांचे हाल

तुटपुंजा पगार यामुळे नैराश्‍यातून कर्मचारी आत्महत्येसारखे पाऊल उचलत असून महाराष्ट्रात तब्बल ३२ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा


धुळे: राज्य परिवहन महामंडळाच्या (State Transport Corporation) कर्मचाऱ्यांना राज्य शासनात विलीनीकरण करा यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या महामंडळाच्या येथील कर्मचाऱ्यांनीही आता संपावर जाण्याचा निर्णय घेतला. कर्मचारी रविवारी मध्यरात्रीपासूनच संपावर (Work stoppage movement) गेल्याने धुळे आगारातूनही एसटीची सेवा बंद होणार आहे. सर्वच कर्मचारी संपावर गेले तर धुळे आगारातून (Dhule Depo) रोजच्या साधारण ३४० फेऱ्या यामुळे बंद आहेत. ऐन सणासुदीच्या काळात हा संप सुरू होत असल्याने प्रवाशांचे मात्र हाल होणार आहेत.


राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण करून शासन नियमाप्रमाणे सर्व सोयी, सवलती, वेतन, भत्ते लागू करावेत या मागण्यांसाठी राज्यभरात विविध ठिकाणी महामंडळाचे कर्मचारी आंदोलन करत आहेत. राज्यातील काही आगारातील कर्मचारी यापूर्वीच संपावर गेल्याने त्या-त्या ठिकाणची एसटीची सेवा पूर्णपणे बंद झाली आहे. या संपाला इतर आगारातील कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान, आता महामंडळाच्या धुळे आगारातील कर्मचाऱ्यांनीही संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार गोपीचंद पडळकर व महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अजयकुमार गुजर यांनी राज्यव्यापी एसटीचे राज्य शासनात विलीनीकरणासाठी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाच्या नोटिशीनुसार आम्ही या संपात सहभागी होत असल्याचा संदर्भ येथील कर्मचाऱ्यांनी दिला आहे. शासनाच्या इतर विभागाच्या तुलनेत सर्वांत कमी पगार/तुटपुंजे वेतन देऊन एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसोबत अन्याय करत आहे. वाढलेली महागाई व दैनंदिन निर्वाहासाठी मिळणारा तुटपुंजा पगार यामुळे नैराश्‍यातून कर्मचारी आत्महत्येसारखे पाऊल उचलत असून महाराष्ट्रात तब्बल ३२ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शासनाने विलीनीकरणाचा निर्णय न घेतल्यास यात वाढ होण्याची शक्‍यता नाकारता येणार नसल्याचे कर्मचाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे आम्ही धुळे आगारातील सर्व राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी संदर्भीत संपाच्या नोटिशीनुसार रविवार मध्यरात्रीपासून संपाला पाठिंबा म्हणून लोकशाही मार्गाने संपात सहभागी होत असल्याचे कर्मचाऱ्यांनी महामंडळाच्या येथील विभाग नियंत्रक, आगार व्यवस्थापकांसह पोलिस प्रशासनाला दिले आहे. गणेश गायकवाड, सुनील गवळी, शेख जमील रफीक शेख, युसूफ रशीद शेख, मनोज गवळी, ललित सोनवणे, अनिल पाटील आदींच्या निवेदनावर नावे, स्वाक्षरी आहेत.



असा बसेल फटका
-रोजच्या ३४० फेऱ्या होतील बंद
-रोज एकूण ४५ हजार किलोमीटरचा बसचा प्रवास थांबणार
-सद्यःस्थितीतील रोजचे १७-१८ लाखांचे उत्पन्न बुडणार


संपावर जाण्याबाबत कर्मचाऱ्यांनी निवेदन दिले आहे, त्याअनुषंगाने आम्ही पोलिस स्टेशनला बंदोबस्तासाठी पत्र दिले आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार पुढील निर्णय घेतले जातील.
-अनुजा दुसाने, आगार व्यवस्थापक, धुळे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT