Farmers 
जळगाव

धुळे,नंदुरबार जिल्ह्यातील साडेसात हजारांवर शेतकरी थकबाकीमुक्त

वीजबिलासह सुधारित थकबाकीच्या ५० टक्के रकमेचा भरणा केल्याने सुधारित थकबाकीमध्येही त्यांना सूट व संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळाली आहे.

सकाळ वृत्तसेवा


धुळे: राज्य शासनाच्या (State government) महा कृषी-ऊर्जा अभियानाच्या माध्यमातून कृषिपंपाच्या वीजबिलातून शेतकऱ्यांना (Farmers) थकबाकीमुक्त होण्यासाठी थकबाकीच्या रकमेत सुमारे ६६ टक्के सूट देत आहे. या योजनेचा फायदा घेत धुळे जिल्ह्यातील दोन हजार ८२६, तर नंदुरबार जिल्ह्यातील चार हजार ८६३ ग्राहकांना संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळाली आहे. या योजनेत सहभागी होऊन कृषिपंपाचे वीजबिल कोरे करावे, चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.


या योजनेत मूळ थकबाकीमधील व्याज व दंडमाफी, तसेच निर्लेखन यानंतरच्या सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम मार्च-२०२२ पर्यंत भरल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकी माफ करत आहे. या योजनेत आत्तापर्यंत जळगाव परिमंडलातील ८२ हजार १४० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. यामध्ये थकबाकी व चालू वीजबिलांपोटी ९७ कोटी ९४ लाख रुपयांचा भरणा केला आहे. यात धुळे जिल्ह्यातील २३ हजार २२२ ग्राहकांनी १५ कोटी ६९ लाख, तर नंदुरबार जिल्ह्यातील १५ हजार ५७३ ग्राहकांनी २२ कोटी ४० लाख रुपये वीजबिल भरले आहे. या शेतकऱ्यांना थकबाकीपोटी भरलेल्या रकमेएवढी सूट, महावितरणकडून निर्लेखनाद्वारे मिळालेली सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूट मिळाली आहे. चालू वीजबिलासह सुधारित थकबाकीच्या ५० टक्के रकमेचा भरणा केल्याने सुधारित थकबाकीमध्येही त्यांना सूट व संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळाली आहे.


रक्कम स्थानिक कामांवर खर्च
या योजनेत वीजबिलांच्या वसुलीतून एकूण ६६ टक्के कृषी आकस्मिक निधी अर्थात प्रत्येकी ३३ टक्के निधी ग्रामपंचायत व जिल्हास्तरावर विकासकामांसाठी खर्च करण्यात येत आहे. हा निधी त्या-त्या ग्रामपंचायत व जिल्ह्याच्या क्षेत्रातच स्थानिक वीजयंत्रणेच्या पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी खर्च करण्यात येत आहे. नवीन उपकेंद्र, नवीन रोहित्र व क्षमतावाढ तसेच नवीन वीजजोडण्या यासह वीज वितरण व उपकेंद्रातील विविध यंत्रणेच्या पायाभूत सक्षमीकरणाचा यात समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Jewellery: सोन्याचे दागिने महागणार? हॉलमार्किंग शुल्कात तब्बल 67% वाढ; बिल किती वाढणार?

Ajit Agarkar च्या जागी कोण? रोहित शर्माशी पंगा महागात पडला, BCCI ने शॉर्टलिस्ट केली दोन नावं, दोघांचेही मुंबई इंडियन्सशी कनेक्शन

सव्वा पायलीचा भात, नऊ भाज्या आणि... माहेरवाशीण नाही बांदेकरांकडे सुना बसवतात गौरी, पूजा बिरारी म्हणते-

गोरं होण्यासाठी औषधांचं अतिसेवन बेतलं जीवावर? डोळ्यातून रक्त, मृतदेह पालथा; २२ वर्षीय BAMS डॉक्टरच्या मृत्यूने अमरावतीत खळबळ

Latest Marathi News Update : आम्ही ECI च्या विवेकाधिकाराची जागा घेऊ शकत नाही - सुप्रीम कोर्टाचं महत्वाचं निरीक्षण

SCROLL FOR NEXT