PADMALAY 
जळगाव

महाभारतकालीन पद्मालय गणेशाचं स्थान कशामुळे आहे, अद्भुत... जरूर वाचा !  

आल्हाद जोशी

एरंडोल : महाभारत या महान ग्रंथात भीम आणि बकासुर युद्धाचा प्रसंग आहे, छोट्या दोस्तांना ही कथा माहीतही आहे, हा प्रसंग जिथे घडल्याचा उल्लेख पुराणांमध्ये आढळतो ते श्री क्षेत्र पद्मालय येथे मात्र कोरोनाकाळात शांतता पसरलेली आहे. एरवी इथं सतत भक्तांची वर्दळ असते.

श्री क्षेत्र पद्मालय हे जगभरातील गणेश भक्तांसाठी अनोखे स्थान आहे. कारण या ठिकाणी उजव्या आणि डाव्या सोंडेचा गणपती एकाच गर्भगृहात आहेत. सर्वत्र कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेले असल्यामुळे एरंडोल तालुक्यातील तसेच शहरातील सर्वच धार्मिक स्थळांच्या परिसरात शांतता पसरली आहे. सर्व धार्मिक स्थळ दर्शनासाठी केव्हा खुले होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद असल्यामुळे या परिसरातील सर्व व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे इथल्या लहान व्यावसायिकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. पद्मालय येथील गणपती मंदिर सुमारे चार महिन्यांपासून बंद असल्यामुळे या परिसरात मोरांचा मुक्त संचार वाढला आहे. मंदिर परिसरात मोरांसह अन्य पक्षांचा मुक्त संचार दिसून येत आहे.

 सद्यस्थितीत कोरोनामुळे शहरासह ग्रामीण भागातील सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. धार्मिक स्थळे बंद असल्यामुळे या परिसरात सर्वत्र शांतता निर्माण झाली असुन या परिसरात असलेले सर्व व्यवसाय देखील बंद आहेत. पद्मालय येथे दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात. संकष्टी चतुर्थीला हजारो भाविक गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र मंदिर बंद असल्यामुळे या ठिकाणी दररोज केवळ चार ते पाच भाविक येत असून बाहेरूनच गणपतीचे दर्शन घेत आहेत. श्रीक्षेत्र पद्मालय येथील मंदिर परिसरात सर्वत्र घनदाट जंगल असून पावसाळ्यात संपूर्ण परीसर हिरवागार झालेला असल्यामुळे भाविक दर्शनासह पर्यटनाचा देखील आनंद लुटत असतात. तसेच मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या भीमकुंड परिसरात जाऊन याठिकाणी नैसर्गिक आनंद घेत असतात. मात्र यावर्षी मंदिर बंद असल्यामुळे भाविकांना या नैसर्गिक आनंदास मुकावे लागत आहे. तसेच श्रीक्षेत्र पद्मालय येथे विवाह समारंभ देखील होत असल्यामुळे परिसरात नागरिकांची कायम गर्दी राहत असते. मंदिर बंद असल्यामुळे भाविकांची संख्या अत्यंत कमी झाल्यामुळे याठिकाणी असलेल्या व्यावसायिकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. शांततेमुळे परिसरात मोरांचा मुक्त संचार वाढला आहे. मोर मंदिर परिसरात तसेच तलाव परिसरात मुक्तपणे संचार करीत आहे. लॉकडाऊन कधी संपेल व मंदिर दर्शनासाठी केव्हा खुले होईल, याची उत्सुकता भाविकांना लागली आहे. मंदिरासमोर असलेल्या तलावातील विविध रंगांचे कमळाचे फुले भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत असते. याशिवाय शहरातील श्री साईगजानन मंदिर देखील बंद असल्यामुळे भाविक मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेत असून या ठिकाणी देखील दररोज भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी स्थानिक पुजारी दररोज सर्व प्रकारचे धार्मिकविधी नियमितपणे करीत आहेत.

भिम आणि बकासुरू राक्षाचे झाले होते युध्द... 
महाभारतात जेव्हा पांडव पदमालयाच्या जंगलात अज्ञात वासात होते तेव्हा भिम व बकासुर राक्षस यांच्यात युधद झाले होते.युध्दात बकासुराचा भिमाने वध केल्यावर तेथे भिमाला तहाण लागली होती. मंदिराच्या काही अंतरावर भिमाने स्वःताच्या हाताचा जोरदार ठोसा मारला. आणि तेथून पाणी निघल्यावर भिमाने आपली तहाण भागवली होती. त्यानंतर या भिम कुंड तयार झाला असून आजही तेथे भिमाचे ठसे, युध्दाच्या खुणा पाहायवयास मिळतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Returns : तब्बल 400 दिवसांनंतर 'माधुरी' परतली! मध्यरात्री 12.40 वाजता 1160 किमीचा प्रवास करून पोहोचली नांदणीत; उपस्थितांना आनंदाश्रू अनावर

Pimpri News : नोकरीपेक्षा आपला व्यवसायच बरा! दोन लाख ४९ हजार जण उद्योग-व्यवसायाकडे वळले

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Italian Style Aloo Paratha: आलू पराठ्याला द्या 'हा' इटालियन ट्विस्ट! चव अशी की रोज हाच पराठा मागाल

आजचे राशिभविष्य - 12 सप्टेंबर 2026

SCROLL FOR NEXT