जळगाव

एरंडोल तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल 

आल्हाद जोशी

एरंडोल : तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने कमी होत असल्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असताना तालुक्यातील ६५ पैकी ११ गावांत ग्रामस्थांनी व स्थानिक प्रशासनाने योग्य पद्धतीने नियोजन केल्यामुळे कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. अकरापैकी तीन ते चार गावे आदिवासी समाजाची असून, ग्रामस्थांनी गावात कोरोनाला प्रवेश करू द्यायचा नाही, असा संकल्प सोडून तो यशस्वी करून दाखविला आहे. 


शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अर्चना खेतमाळीस, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज शेख, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे, तुषार देवरे, पालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्यासह ग्रामसेवक, आरोग्यसेवक, महसूल व पोलिस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान, स्थानिक समिती सदस्य, सामाजिक व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, नगराध्यक्ष रमेश परदेशी, नगरसेवक, पंचायत समितीचे सदस्य यांनी कोरोनाला रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करून कोरोनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली. कोरोना रुग्णांना ऑक्सिजन बेडची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी प्रशासनाने केलेल्या आवाहनास सामाजिक संस्था, तसेच विविध पदाधिकाऱ्यांनी आर्थिक मदत करून रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पालिकेने कोरोना रुग्ण सापडलेल्या परिसरात रस्ते बंद करून उपाययोजना केल्यामुळे शहरात कोरोनाला रोखण्यात यश आले. 

प्रशासनाला नागरिकांचे मिळाले सहकार्य 
तालुक्यातील ६५ पैकी दौलतपुरा, टाकरखेडे, पिंपळकोठा प्र. चा., आनंदनगर, पद्मालय, गालापूर, आंबे, जान्फळ, कानाशी, हनमंतखेडे मजरे, पळासदड या अकरा गावांत आजपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसल्यामुळे स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांनी या गावांत कोरोनाचा प्रवेश रोखला आहे. विशेष म्हणजे दौलतपुरा, पळासदड, पद्मालय, गालापूर या गावांत आदिवासी समाजाची मोठ्या प्रमाणावर वस्ती असून, त्यांनी योग्य नियोजन करून कोरोनाला प्रवेश करू दिलेला नाही. ग्रामस्थ, युवक, स्थानिक प्रशासनाचे कर्मचारी यांनी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे. शहरासह तालुक्यातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोनाबाबत जनजागृती करून, तसेच नागरिकांच्या मनात असलेली भीती दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Mumbai Metro: मुंबईत मेट्रो कामाचा आणखी एक बळी! धावत्या दुचाकीवर लोखंडी बॅरिकेड कोसळला, एकाचा मृत्यू

सोन्याच्या हव्यासापोटी सात मित्र पोहोचले शापित हवेलीत; ‘भूतम् भयम्’चा थरार कुठे आणि कधी पहायला मिळणार?

Budh Guru Yog Horoscope 2026 : बुध-गुरुची ही 'शुभ युती' बदलणार भाग्य! 'या' 4 राशींसाठी ठरू शकतो लाभदायी; आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

SCROLL FOR NEXT